
Saurav Das, Ashutosh Ranka, Abhijeet Dipke, CJP Protest,
Abhijeet Dipke Video for Saurav and Ashutosh: जंतरमंतरवर आंदोलन केल्याप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका गेल्या सहा ते आठ दिवसांपासून तुरुंगात आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या कथित मनमानी कारभार आणि गैरव्यवहारांविरोधात त्यांच्या राजीनाम्याची मागणासाठी त्यांनी जंतरमंतरवर गनिमी काव्याने हे आंदोलन केलं होतं. पण दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांना तुरुंगात टाकले. त्यानंतर काल झालेल्या सुनावणी दरम्यानही सौरव आणि आशुतोष यांची जामीन याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे या दोघांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आहे.
या सगळ्या घडामोडींवर कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके हे त्यांचे सहकारी सदस्य सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासाठी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचवेळी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला दिपके यांनी सध्या ब्रेक लावला आहे. एवढेच नाही तर त्यांनी आंदोलकांना घरी जाण्याचे आवाहनही केले आहे.
Ahijeet Dipke granted Bail : अभिजित दिपके यांना जामीन मंजूर, ‘या’ मोठ्या
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अभिजीत दिपके यांनी सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत झालेल्या संवादाची आठवण शेअर केली आहे.”तुरुंगात जाण्याच्या शक्यता आणि कोण जास्त काळ तुरुंगात राहू शकेल यावर आमची अनेकदा चर्चा झाली आहे. “सौरव म्हणत होता की मी तुरुंगात एक दिवसही टिकू शकणार नाही, असे म्हणत होता. पण तो गेल्या सहा दिवसांपासून तुरुंगात आहे.
“जूनमध्ये जंतर-मंतरवर सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान त्याला सुरुवातीला खूप मृदू स्वभाव आणि कोल्ड कॉफी प्यायल्यामुळे ट्रोल करण्यात आले होते, पण आता त्याच्याकडे बघा, तो तिरंगा फडकावत हसत तुरुंगात गेला मी फक्त त्यांच्या सुचनांचे पालन केले. पण प्रत्यक्षात मात्र या दोघांनीही ही चळवळ पुढे नेली आणि त्यांनी ज्या धैर्याने आणि आत्मविश्वासाने नेतृत्व केले त्यामुळे मलाही मोठे बळ मिळाले.
Abhijeet Dipke : शाहरुख खानचा फोटो, दोन सहकाऱ्यांची आठवण; अभिजीत ..
अभिजीत दिपके यांनी यावेळी बोलताना, फ्रान्समध्ये सुरू असलेली अशांतता आणि सीजेपी आंदोलन यांच्यात तुलना करणाऱ्यांवरही निशाणा साधला आणि दोन्ही परिस्थिती पूर्णपणे भिन्न असल्याचे स्पष्ट केले. “भारतात आशुतोष आणि सौरव हसत हसत तुरुंगात गेले. पण फ्रान्समध्ये जे घडत आहे, आम्ही तसे काहीही केले नाही. पण त्यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्यात आले आहे हे कळल्यावर त्यांनी शांततेचा मार्ग निवडला. आशु आणि सौरव सत्याग्रह करत आहेत, हे दोघेही लवकरच तुरुंगातून बाहेर येतील तेव्हा संपूर्ण देश त्यांना सलाम करेल.” अशी भावनाही दिपके यांनी व्यक्त केली.
अभिजीत दिपके यावेळी आशुतोष आणि सौरव यांच्यासाठी खूप भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या व्हिडीओमध्ये बोलताना ते म्हणाले की, “आता काही लोकांना ते बघून वाटेल, मी भावूक झालो आहे, बघा याने लोकांना कसे रडवले. पण आमच्या भावना ही आमची कमजोरी नाही. मी यावेळी भावूक होतो कारण सौरव आणि आशुतोष हे माझे भाऊ आहेत. मी त्यांची काळजी काळजी. हे माझे त्यांच्यावरचे प्रेम आहे. मी तुम्हा लोकांना घाबरत नाही, दोन दिवस तुरुंगात ठेवले, तरीही मला तुमची भीती वाटत नाही.”