गौतम अदानींचा विक्रम! काही तासांत कमावले 73 हजार कोटी रुपये, एकूण संपत्तीतही झालीये भरघोस वाढ!
हिंडेनबर्ग अहवाल (Hindenberg Report) जगासमोर आल्यानंतर उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. या संदर्भातील आता एक मोठी अपडेट समोर आली आहे, जी गौतम अदानी यांच्या संपत्तीबाबत आहे. काही काळापूर्वी ते जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते, आता तो टॉप 20 मध्येही नाही. ब्लूमबर्गच्या बिलियनेअर इंडेक्सनुसार, (Bloomberg’s Billionaire Index) गौतम अदानी हे टॉप 20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले असून सध्या ते 22 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
[read_also content=”सामान्य नागरिक सोडा पाकिस्तानातील ‘या’ भागात तर लष्करही राहतं दहशतीत! 15 वर्षांपासून ‘या’ संघटनेनं आणले नाकी नऊ https://www.navarashtra.com/world/pakistani-military-feel-helpless-in-khyber-pakhtunkhwa-as-there-is-ttp-is-so-powerful-nrps-366907.html”]
गौतम अदानी यांचे एका दिवसात सुमारे 10 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, फेसबुकचे संस्थापक झुकरबर्ग यांच्या संपत्तीत $12.5 अब्जची वाढ झाली असून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 13व्या स्थानावर पोहोचले आहेत. अदानी यांच्या संपत्तीत $58 अब्जची घट झाली आहे सप्टेंबरमध्ये अदानीची एकूण संपत्ती १५५.७ अब्ज डॉलर होती. सोमवारी निव्वळ संपत्ती $92.7 अब्ज होती. डिसेंबरपर्यंत, जगातील अव्वल श्रीमंतांमध्ये अदानी हे एकमेव श्रीमंत होते, ज्यांच्या संपत्तीत त्या वर्षी वाढ झाली होती. आता जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत 22 व्या क्रमांकावर आले आहेत.
25 जानेवारी रोजी हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत 32,000 शब्दांचा अहवाल प्रसिद्ध केला. अहवालाच्या निष्कर्षांमध्ये 88 प्रश्नांचा समावेश आहे. अहवालात दावा करण्यात आला आहे की समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतला आहे. शेअर्सच्या वाढत्या किमतींमुळे अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी यांची संपत्ती तीन वर्षांत $1 अब्जने वाढून $120 अब्ज झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे. या कालावधीत समूहातील 7 कंपन्यांचे समभाग सरासरी 819 टक्क्यांनी वाढले आहेत.