Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चांद्रयान-३ च्या यशानंतर आता इस्रोचं मिशन समुद्रयान! खोल समुद्रातील जगाचा शोध घेणार, उलगडणार अनेक रहस्य

मत्स्य 6000 नावाच्या पाणबुडीचं बांधकाम देशात सुमारे 2 वर्षांपासून सुरू आहे. मत्स्य 6000 ची पहिली चाचणी 2024 मध्ये चेन्नईच्या किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरात घेतली जाईल.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 12, 2023 | 09:54 AM
चांद्रयान-३ च्या यशानंतर आता इस्रोचं मिशन समुद्रयान! खोल समुद्रातील जगाचा शोध घेणार, उलगडणार अनेक रहस्य
Follow Us
Close
Follow Us:

भारताची बहुप्रतिक्षित चांद्रयान -3 (Chandrayaan – 3) मोहीम यशस्वी झाली. आता विक्रम लँडरसह प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमध्ये टाकण्यात आले आहे. त्यांनतंर काही दिवसांत इस्रोनं सुर्य मिशनही () यशस्वीरित्या लाँच केलं. सध्याच्या अपडेटनुसार, आदित्या एल -1 नं नुकतंच तीसऱ्या कक्षेत प्रवेश केला आहे. आता इस्रोकडू त्यांच्या नव्या मोहीमेबद्दल माहिती देण्यात आली आहे. इस्रो (Isro) लवकरच मिशन समुद्रयान (Mission Samudrayaan) लाँच करणार आहे.  या मिशन अंतर्गत स्वदेशी पाणबुडी (submersible) 6 हजार मीटर खाली खोल पाण्यात पाठवण्यात येणार आहे आणि समुद्राच्या पोटातील अनेक रहस्य उलगडले जाणार आहे.

[read_also content=”मोरक्को नतंर आता लिबियावर संकट! डॅनियलने वादळाने केला कहर, 2000 हून अधिक मृत्यूची भीती, देशात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर https://www.navarashtra.com/world/at-list-2000-died-in-libya-due-to-daniel-storm-and-flood-nrps-456891.html”]

काय आहे मिशन समुद्रयान

मिशन समुद्रयान मध्ये मत्स्य 6000 (Masya 6000) स्वदेशी पाणबुडीचा समावेश असून ही पाणबुडी तयार करण्याचं काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या मिशनमध्ये तीन जण जाणार आहेत. मत्स्य 6000 ची पहिल्या चाचणी 2024 मध्ये चेन्नईच्या किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरात घेतली जाईल. टायटॅनिकच्या अवशेषाचा शोध घेण्यासाठी पर्यटकांना उत्तर अटलांटिक महासागरात नेत असताना जून 2023 मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर भारताने आपली स्वदेशी पाणबुडी तयार करताना अधिक काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.

मत्स्य 6000 हे निकेल, कोबाल्ट, मॅंगनीज, हायड्रोथर्मल सल्फाइड आणि गॅस हायड्रेट्स सारख्या मौल्यवान खनिजांचे अन्वेषण करण्यासाठी पाठवले जाईल. हे खोल-समुद्रातील हायड्रोथर्मल व्हेंट्स आणि कमी-तापमान मिथेन सीप्समध्ये उपस्थित केमोसिंथेटिक जैवविविधतेची तपासणी करेल.

मत्स्य 6000 ची निर्मिती कोण करत आहे?

मत्स्य 6000 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) द्वारे विकसित केले जात आहे. या सबमर्सिबलचे डिझाईन, चाचणी प्रक्रिया, प्रमाणन, मानक ऑपरेटिंग प्रोटोकॉलचे पुनरावलोकन यासाठी NIOT शास्त्रज्ञ देखील काम करत आहेत. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन म्हणाले की,  समुद्रयान मोहीम खोल समुद्रात शोधासाठी सुरू केली जात आहे. आम्ही 2024 च्या पहिल्या तिमाहीत 500 मीटर खोलीवर सागरी चाचण्या घेणार आहोत. हे मिशन 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीन या देशांनी मानवयुक्त पाणबुड्या विकसित केल्या आहेत.

एनआयओटीचे संचालक जीए रामदास म्हणाले की, मत्स्य 6000, तीन व्यक्तींसाठी 2.1 मीटर व्यासाचा गोल, डिझाइन आणि तयार करण्यात आला आहे. हा गोल 80 मिमी जाडीच्या टायटॅनियम मिश्र धातुपासून बनवला जात आहे ज्यामुळे 6,000 मीटर खोलीवर 600 बारचा (समुद्र सपाटीच्या दाबापेक्षा 600 पट जास्त) दाब सहन करावा लागतो. सबमर्सिबल 96-तास ऑक्सिजन पुरवठ्यासह 12 ते 16 तास सतत ऑपरेट करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

Web Title: After chnadrayaan isro soon will launch mission samudrayaan to reveal secrets of sea nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2023 | 09:50 AM

Topics:  

  • Chandrayaan 3
  • ISRO

संबंधित बातम्या

SUAS आणि ISRO कडून ‘इस्रो प्रदर्शन २०२५’चे आयोजन! इंदोरमध्ये रंगला कार्यक्रम
1

SUAS आणि ISRO कडून ‘इस्रो प्रदर्शन २०२५’चे आयोजन! इंदोरमध्ये रंगला कार्यक्रम

ISRO देणार मोफत ट्रेनिंग! शिक्षणही आणि थोडेफार पैसेही; कसे करावे अर्ज?
2

ISRO देणार मोफत ट्रेनिंग! शिक्षणही आणि थोडेफार पैसेही; कसे करावे अर्ज?

Gaganyan Mission: गगनयानच्या दिशेने एक पाऊल पुढे! ISRO ने केले ‘एअर ड्रॉप टेस्ट’चे यशस्वी परीक्षण
3

Gaganyan Mission: गगनयानच्या दिशेने एक पाऊल पुढे! ISRO ने केले ‘एअर ड्रॉप टेस्ट’चे यशस्वी परीक्षण

Timelapse Video : भारताचे नभांगणातील सौंदर्यदर्शन! शुभांशू शुक्ला यांनी ISS वरून टिपला भारताचा जादुई टाइमलॅप्स
4

Timelapse Video : भारताचे नभांगणातील सौंदर्यदर्शन! शुभांशू शुक्ला यांनी ISS वरून टिपला भारताचा जादुई टाइमलॅप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.