Air India च्या अडचणीत वाढ; अहमदाबाद दुर्घटनेप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, केली 'ही' मोठी मागणी
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला होता. यामध्ये प्रवास करत असणाऱ्या 242 पैकी 241 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक प्रवासी सुखरूप बचावला आहे. मात्र त्यानंतर एअर इंडियाच्या अडचणी संपायचे काही चित्र पाहायला मिळत आहे. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. एअर इंडियाच्या या प्रकरणात सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. एअर इंडियाच्या बोईंग विमानाचे सुरक्षा ऑडिट पूर्ण होईपर्यंत या विमानांची उड्डाणे रद्द करण्याची मागणी जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. अन्य देखील काही महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. आता सुप्रीम कोर्ट या याचिकेवर कधी सुनावणी घेणार आणि कोणता निर्णय देणार हे पाहणे आवश्यक असणार आहे.
जनहित याचिकेत काय?
सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेत अहमदाबाद विमान दुर्घटना आणि DGCA नियमांमध्ये झालेली चूक याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. अहमदाबाद दुर्घटनेमुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच केंद्र सरकार, एअर इंडिया, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा यांना या याचिकेत पक्षकार करण्यात आले आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मोठ्या बोईंग ७७७ विमानामधील सुरक्षा तपासणी वाढवली जाणार आहे. याबाबत टाटा समूहाच्या मालकीच्या एअरलाईनने याबाबत निवेदनात म्हटले आहे. एअर इंडियाला अलीकडचे काही समस्यांचा सामना करावा लागला आहे. गेल्या सहा दिवसांत एअर इंडियाने किमान ८३ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करावे लागली आहेत. कंपनीचे इंजिनिअर आणि पायलट हे सर्व ती आवश्यक खबरदारी घेत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. बुधवारी देखील एअर इंडियाने आपली तीन उड्डाणे रद्द केली आहेत. दुबई ते दिल्ली आणि टोरांटो ते दिल्ली ही फ्लाईट रद्द केली आहे. एअर इंडियाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया कंपनी जुलै महिन्याच्या मध्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर विमानांच्या उड्डाणामध्ये १५ टक्के कपात करणार आहे.
मुंबई लखनौ विमान रद्द
बुधवारी सकाळी मुंबईतून लखनौला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक रद्द करण्यात आले आहे. दिल्लीत सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे फ्लाईट रद्द केली गेली. दरम्यान आता एअर इंडिया आपल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणात १५ टक्क्यांनी कपात करणार आहे. त्याबाबत आता कंपनीने निर्णय घेतल्याचे समजते आहे.