एअर इंडिया कंपनीचा मोठा निर्णय (फोटो- सोशल मीडिया)
अहमदाबाद: १२ जून रोजी अहमदाबादमध्ये लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला होता. या दुर्घटनेत २४१ पैकी २४० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर एक प्रवासी सुखरूप बचावला आहे. आता या घटनेनंतर एअर इंडियाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया कंपनी जुलै महिन्याच्या मध्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर विमानांच्या उड्डाणामध्ये १५ टक्के कपात करणार आहे.
मोठ्या बोईंग ७७७ विमानामधील सुरक्षा तपासणी वाढवली जाणार आहे. याबाबत टाटा समूहाच्या मालकीच्या एअरलाईनने याबाबत निवेदनात म्हटले आहे. एअर इंडियाला अलीकडचे काही समस्यांचा सामना करावा लागला आहे. गेल्या सहा दिवसांत एअर इंडियाने किमान ८३ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करावे लागली आहेत. कंपनीचे इंजिनिअर आणि पायलट हे सर्व ती आवश्यक खबरदारी घेत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. बुधवारी देखील एअर इंडियाने आपली तीन उड्डाणे रद्द केली आहेत. दुबई ते दिल्ली आणि टोरांटो ते दिल्ली ही फ्लाईट रद्द केली आहे.
मुंबई लखनौ विमान रद्द
बुधवारी सकाळी मुंबईतून लखनौला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक रद्द करण्यात आले आहे. दिल्लीत सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे फ्लाईट रद्द केली गेली. दरम्यान आता एअर इंडिया आपल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणात १५ टक्क्यांनी कपात करणार आहे. त्याबाबत आता कंपनीने निर्णय घेतल्याचे समजते आहे.
हैदराबाद आणि दिल्लीत ‘या’ कारणांमुळे फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग
दिल्ली आणि हैद्राबादमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. सकाळच्या सुमारास दिल्लीतून आणि हादरबाडवरून दोन विमानांनी टेक ऑफ केले होते. मात्र काही कारणांमुळे या दोन्ही विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. या दोन्ही विमानातून सुमारे २६० प्रवासी प्रवास करत होते. दिल्ली एअरपोर्टवरून लेहला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे समजते आहे.
तर दुसरीकडे हैद्राबादवरुन तिरुपतीला जाण्यासाठी स्पाईसजेट एअरलाईन्सच्या विमानाने उड्डाण भरले होते. मात्र १० मिनिटांतच हे विमान पुन्हा हैद्राबादला लँड करण्यात आले आहे. हैद्राबाद ते तिरुपती या फ्लाईटमध्ये ८० प्रवासी प्रवास करत असल्याचे समजते आहे. या दोन्ही फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग केल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सध्या दोन्ही फ्लाईटमधीं २६० प्रवासी सुखरूप असल्याचे समजते आहे.