Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनमधील रहस्यमय आजार मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाचा एकही रुग्ण भारतात नाही : एम्सचा मोठा दावा

चीनमधील वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसनंतर अख्खं जग सुन्न झाले होते. आता चीनमध्ये पुन्हा नवीन आजार उद्भवला आहे. त्याचे सिमट्म्स भारतातील रुग्णांमध्ये आढळल्याच्या चर्चा आहेत. परंतु, केंद्र सरकारने गुरुवारी दुपारी एक निवेदन जारी केले आहे. यात म्हटलं आहे की, दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल झालेले ते रुग्ण न्यूमोनियाचे आहेत. त्यांचा चीनमधील आजाराशी काहीही संबंध नाही.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 07, 2023 | 03:09 PM
AIIMS

AIIMS

Follow Us
Close
Follow Us:

Chinas Disease Microplasma Pneumonia : चीनच्या वुहान शहरातून आलेल्या करोना विषाणूने संपूर्ण जग हादरवलं होतं. दीड ते दोन वर्ष संपूर्ण जगभर लॉकडाऊन लावण्यात आल्याचं सर्वांनीच पाहिलं आहे. आता पुन्हा एकदा चीनमधील एका गूढ विषाणूने लोकांच्या चिंता वाढल्या आहेत. हा गूढ विषाणू भारतात सापडल्याच्या बातम्यांनी लोकांना चिंतेत टाकलं आहे. चीनमधील न्यूमोनिया विषाणूने भारतात प्रवेश केला असून सात भारतीयांना या आजाराची लागण झाल्याचं वृत्त अनेक वृत्तवाहिन्या आणि वृत्तसंकेतस्थळांनी प्रसिद्ध केलं आहे. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात या गूढ आजाराने ग्रस्त रुग्ण आढळल्याचा दावा वेगवेगळ्या वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. परंतु, हे वृत्त खोटं असल्याचं एम्स रुग्णालयाने म्हटलं आहे.

एम्सच्या मायक्रो बायोलॉजी विभागात ६११ नमुन्यांची चाचणी

केंद्र सरकारने गुरुवारी (७ डिसेंबर) दुपारी एक निवेदन जारी केलं आहे. यात म्हटलं आहे की, एम्स रुग्णालयात दाखल झालेले ते रुग्ण न्युमोनियाचे आहेत. परंतु, याचा चीनमधील आजाराशी काहीही संबंध नाही. जानेवारी २०२३ पासून एम्सच्या मायक्रो बायोलॉजी विभागात ६११ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आणि त्यापैकी कोणत्याही चाचणीत मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया आढळलेला नाही. केंद्र सरकार आणि आरोग्य विभाग यावर लक्ष ठेवून आहे.

मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाचे रुग्ण आढळ्याचा दावा

एम्समध्ये सात मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाचे रुग्ण आढळ्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता. एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान हे रुग्ण आढळले होते असंही काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. म्हणजेच चीनमध्ये हा विषाणू सापडण्याच्या आधीच हा आजार भारतात दाखल झाला होता. खरंतर, चीनमध्ये ऑक्टोबर २०२३ मध्ये मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाचा पहिला रुग्ण आढळल्याचं तिथल्या आरोग्य विभागाने सांगितलं होतं. तर २३ नोव्हेंबर २०२३ रोजी चीनमधील माध्यमांनी एक नवा गूढ विषाणू पसरल्याची भिती व्यक्त केली होती.

चीनमध्ये काही शाळकरी विद्यार्थ्यांना या आजाराची लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. बाधित मुलांच्या फुप्फुसांमध्ये जळजळ, खूप ताप, खोकला आणि सर्दी अशी लक्षणं दिसून आली होती. दरम्यान, भारतीय आरोग्य मंत्रालयाने १० दिवसांपूर्वी या आजाराबाबत देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली होती, तसेच सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Web Title: Aiims reveals whether chinas disease microplasma pneumonia patients have been found in india nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2023 | 03:08 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.