Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नक्कल करण्यासाठी सुद्धा अक्कल…; परदेशात AIMIM नेते असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानला धू धू धुतलं

Asaduddin Owaisi on pakistan : ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये असदुद्दीन ओवैसी यांचा देखील समावेश आहे. कुवैत दोऱ्यावेळी त्यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 27, 2025 | 11:47 AM
AIMIM Asaduddin Owaisi strongly criticized Pakistan in Kuwait on operation sindoor

AIMIM Asaduddin Owaisi strongly criticized Pakistan in Kuwait on operation sindoor

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारताने पहलगाम हल्ल्याच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर ही लष्करी कारवाई केली. यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईमध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून दहशतवादी अड्डे देखील उद्धवस्त करण्यात आले आहे. या पाकिस्तानकडून जगाभरात सहानभूतीचे राजकारणे केले जात आहे. हा पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी भारताकडून शिष्टमंडळे पाठवले जात आहेत. सर्वपक्षीय संसदीय सदस्य असलेल्या या शिष्टमंडळांनी विविध देशांमध्ये जाऊन भारताची दहशतवादाविरोधात असणारी ठाम भूमिका अधोरेखित केले आहे. यावेळी  कुवैतला गेलेल्या भारताच्या शिष्टमंडळात AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत.

भारताकडून 33 देशांमध्ये शिष्टमंडळे पाठवण्यात आली आहेत. शिष्टमंडळात AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा देखील सहभाग आहे. कुवैतला गेलेल्या भारताच्या शिष्टमंडळात AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी आहेत. त्यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पाकिस्तानच्या सैन्य प्रमुखांनी पीएम शहबाज शरीफ यांना एक फोटो गिफ्ट केला. त्याचा सुद्धा उल्लेख ओवैसी यांनी केला. त्याचबरोबर कुवैतमध्ये त्यांनी तिथे असणाऱ्या भारतीयांशी संवाद साधला. यावेळी भारताची ऑपरेशन सिंदूरबाबत ठाम भूमिका आणि दहशतवादविरोधात घेतलेल्या भूमिकेवर ठाम असल्याचे AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

यावेळी असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “पाकिस्तान धर्माचा मुद्दा उचलून ते मुस्लिम आहेत, हे बोलू शकत नाही. भारतात मुस्लिमांची लोकसंख्या जास्त आहे. आम्ही भारतीय मुस्लिम पाकिस्तानपेक्षा जास्त प्रामाणिक आहोत” पाकिस्तानच्या सैन्य प्रमुखांनी त्यांचे पीएम शहबाज शरीफ यांना एक फोटो भेट म्हणून दिला. त्यावरुन ओवैसींनी पाकिस्तानची खिल्ली उडवली. म्हणाले, “या मूर्ख जोकर्सना भारताशी सामना करायचा आहे. 2019 सालच्या चिनी सैन्यासोबतच्या ड्रीलचा एक फोटो त्यांनी शहबाज शरीफ यांना भारतावर विजय म्हणून गिफ्ट केला” “पाकिस्तान हेच करतो. नक्कल करण्यासाठी अक्कल पाहिजे. पाकिस्तानकडे अक्कल नाही” अशा कडक शब्दांत असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे.

Dehshatgardi aur Pakistan ki saazisho’n ko benaqab karne ke liye Kuwait pahunche Barrister @asadowaisi. Barrister Owaisi ne All-Party Delegation ke members ke saath Kuwait mein Deputy Prime Minister and Minister of State for Cabinet Affairs Sherida Abdullah Saad Al-Maousharji se… pic.twitter.com/X1G2xFFEfT — AIMIM (@aimim_national) May 26, 2025

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “पाकिस्तानला FATF च्या ग्रे लिस्टमध्ये पुन्हा टाकलं पाहिजे. FATF च्या ग्रे लिस्टच महत्त्व हे आहे की, जेव्हा तुम्ही पैशाचा व्यवहार करणार, तेव्हा त्या देशाच्या प्रत्येक व्यवहारावर बारीक लक्ष असतं. पाकिस्तान भारताविरुद्ध दहशतवाद्यांना पैसा पुरवण्यासाठी हवाला किंवा मनी लॉन्ड्रिंगचा मार्ग अवलंबतो. त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा FATF मध्ये टाकलं पाहिजे. कारण IMF कडून दिलं जाणारं 2 अब्ज डॉलर्सच कर्ज पाकिस्तानी सैन्य वापरणार” असे मत असदुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत.

Web Title: Aimim asaduddin owaisi strongly criticized pakistan in kuwait on operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 11:47 AM

Topics:  

  • Asaduddin Owaisi
  • india pakistan war
  • Opreation Sindoor

संबंधित बातम्या

Nicolas Maduro : जर ट्रम्प करू शकतात, तर पंतप्रधान मोदी का नाही? असदुद्दीन ओवैसी असं का म्हणाले?
1

Nicolas Maduro : जर ट्रम्प करू शकतात, तर पंतप्रधान मोदी का नाही? असदुद्दीन ओवैसी असं का म्हणाले?

India-Pakistan Water Dispute: पाकिस्तानची तडफड! चिनाब नदीवर भारताचा ‘Dulhasti-2’ प्रकल्प; ट्रम्प राजवटीत नवा जागतिक पेच
2

India-Pakistan Water Dispute: पाकिस्तानची तडफड! चिनाब नदीवर भारताचा ‘Dulhasti-2’ प्रकल्प; ट्रम्प राजवटीत नवा जागतिक पेच

Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी
3

Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.