अहमदाबाद: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यासंबंधी दररोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. असे असतानाच आता अहमदाबादमधीलऋषी भट्ट नावाच्या व्यक्तीचा हल्ल्याच्या वेळचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे व्हिडिओ २२ एप्रिल रोजी पहलगाम परिसरात चित्रित करण्यात आले होते. २२ एप्रिलला ज्या वेळी बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांवर गोळीबार झाला, त्यावेळी चित्रित झालेला हा व्हिडीओ आहे . हे उघड झाल्यानंतर समोर आलेले सत्य धक्कादायक आहे.
अहमदाबादचे रहिवासी ऋषी भट्ट त्या दिवशीच बैसरण व्हॉलीत पर्यटनासाठी गेले होते. झिपलाईचा अनुभव घेत असताना ते व्हिडीओदेखील शुट करत होते. या व्हिडीओमध्ये खाली गोळ्यांचा वर्षाव होत असताना ते झिपलाइन करताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, दहशतवादी गोळीबार करत असताना ” अल्लाह हू अकबर”चे नारे देत होते. तर झिप लाईन ऑपरटेरही त्यांच्यासोबत अल्लाह हू अकबरचे नारे देत त्याने तीन वेळा मान हलवल्याचे दिसत आहे. गोळीबार सुरू असतानाच त्याने ऋषी भट्ट यांना झिपलाइनवर मरण्यासाठी पाठवले. पण सुदैवाने ऋषी भट्ट यांचा जीव वाचला. झिपलाइन ऑपरेटरने ऋषीला सोडले तेव्हा तो अल्लाहू अकबरचा जयजयकार करत होता तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सध्या एनआयएने त्या झिपलाइन ऑपरेटरला ताब्यात घेतले आहे.
पिंपरी-चिंचवड़ पोलीस दलातील तीन अधिकारी, दोन कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक जाहीर
ऋषी भट्ट म्हणाले की, त्यांच्यापूर्वी त्यांच्या पत्नी, मुलगा आणि इतर चार जणांनी झिपलाइन केली, तेव्हा ऑपरेटरने काहीही उच्चारले नव्हते. मात्र, त्यांच्या झिपलाइनच्या वेळी ऑपरेटरने “अल्लाहू अकबर” असे तीन वेळा म्हटले आणि लगेचच गोळीबार सुरू झाला . या घटनेनंतर, भट्ट यांनी झिपलाइनच्या मध्यभागी थांबून स्वतःला हुकमधून सोडवले आणि सुमारे २० फूट उंचीवरून उडी मारून खाली उतरले. त्यानंतर त्यांनी पत्नी आणि मुलासह सुरक्षित स्थळी आश्रय घेतला. या घटनेनंतर, राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी झिपलाइन ऑपरेटरला चौकशीसाठी बोलावले आहे. सुरक्षा यंत्रणांनी घटनेच्या ठिकाणी उपस्थित सर्व व्यक्तींना चौकशीसाठी पाचारण केले असून, ऑपरेटरची भूमिका तपासली जात आहे .
झिपलाइन ऑपरेटरवर संशयाची सुई
२२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरण भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला. हे ठिकाण पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या घटनेतून बचावलेल्या ऋषी भट्ट यांनी गंभीर आरोप करत झिपलाइन ऑपरेटरवर संशय व्यक्त केला आहे.
भट्ट म्हणाले, “माझ्या आधी ९ जणांनी झिपलाइनचा अनुभव घेतला, पण ऑपरेटरने त्यावेळी काहीही बोलले नाही. मी झिपलाइनवर सरकत असताना त्याने तीन वेळा ‘अल्लाहू अकबर’ ओरडले आणि लगेचच गोळीबार सुरू झाला. त्यामुळे मला त्या व्यक्तीवर संशय आहे. तो एका सामान्य काश्मिरी माणसासारखा दिसत होता, पण वागणूक संशयास्पद वाटली.”
‘या’ दिवशी Tata Altroz Facelift लाँच होण्याची शक्यता, होतील ‘हे’ मोठे बदल
खड्ड्यात लपून वाचला जीव
गोळीबार सुरू झाल्यानंतर ऋषी भट्ट आणि त्यांचा परिवार जीव वाचवण्यासाठी एका खड्ड्यासारख्या ठिकाणी लपले. त्यांनी सांगितले, “आम्ही पाहिले की अनेक लोक अशा खड्ड्यांमध्ये लपले होते, जिथे कोणी सहज दिसणार नव्हते. गोळीबार सुमारे ८-१० मिनिटे चालू होता. थोड्या वेळाने तो थांबला, पण नंतर पुन्हा सुरू झाला आणि ४-५ जणांना गोळ्या लागल्या.”
ऋषी भट्ट यांनी सांगितले की, “जेव्हा आम्ही मुख्य गेटपर्यंत पोहोचलो, तेव्हा लक्षात आले की बरेच स्थानिक आधीच पळून गेले होते. एका पोनी गाईडने आम्हाला सुरक्षित स्थळी नेले. थोड्याच वेळात आम्हाला भारतीय लष्कराचे जवान दिसले. त्यांनी सर्व पर्यटकांना संरक्षण दिले. लष्कराने अवघ्या २०-२५ मिनिटांत संपूर्ण भाग ताब्यात घेतला आणि आम्हाला सुरक्षिततेचा दिलासा मिळाला.”