फोटो सौजन्य: @iamnagajan (X.com)
भारतात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार्स ऑफर करत आहे. यातीलच एक आघाडीची कार उत्पादक कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. टाटा मोटर्सने नेहमीच ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार बेस्ट कार ऑफर केल्या आहेत. आता कंपनीचे विशेष लक्ष हे इलेक्ट्रिक सेगमेंटकडे लागले आहे. कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये दमदार फीचर्स असणाऱ्या आणि उत्तम रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे.
भारतातील आघाडीच्या चार उत्पादकांपैकी एक असलेली टाटा मोटर्स आता लवकरच Tata Altroz चे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार कधी लाँच केली जाऊ शकते? यात कोणत्या प्रकारचे बदल केले जाऊ शकतात? त्याबद्दल जाणून घेऊया.
आता Mahindra Thar चे ‘हे’ आठ व्हेरियंट मार्केटमध्ये दिसणारच नाही ! कंपनी वेगळ्याच विचारात
टाटा मोटर्स अल्ट्रोजचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हॅचबॅक कारचे फेसलिफ्ट व्हर्जन 21 मे 2025 रोजी लाँच केली जाऊ शकते. परंतु, अद्याप कंपनीकडून कोणतीही अनधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
रिपोर्ट्सनुसार, टाटा अल्ट्रोज फेसलिफ्टमध्ये बहुतेक बदल हे कॉस्मेटिक असतील. या कारच्या फ्रंट बंपर, हेडलाइट्स, रिअर बंपर आणि लाईट्समध्ये बदल केले जाऊ शकतात. इंटिरिअरमध्ये देखील काही बदल केले जाऊ शकतात. सध्याच्या व्हर्जनच्या तुलनेत अल्ट्रोज फेसलिफ्टमध्ये काही नवीन फीचर्स देखील दिले जाऊ शकतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा अल्ट्रोज फेसलिफ्टमध्ये आणखी अनेक फीचर्स दिले जाऊ शकतात. ज्यामध्ये व्हेंटिलेटेड सीट, 10.2 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, अपडेटेड अँबियंट लाईट, ऑटो डिमिंग ओआरव्हीएम, पॉवर्ड ड्रायव्हर सीट यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. यासोबतच, स्टँडर्ड म्हणून सहा एअरबॅग्ज आणि ADAS देखील मिळेल.
वाह बॉस काय कार आहे ! नवीन Range Rover Evoque Autobiography भारतात लाँच, किंमत असेल…
माहितीनुसार, फेसलिफ्ट व्हर्जनमध्येही अल्ट्रोजच्या सध्याच्या व्हर्जनमध्ये दिलेल्या इंजिन पर्यायांसह आणले जाईल. सध्या या कारमध्ये 1.2 लिटर पेट्रोल, सीएनजी आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन वापरले जातात.
अलिकडेच ही कार टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली होती. यावेळी ही कार पूर्णपणे झाकलेली होती पण तरीही त्याच्या एक्सटिरिअर आणि इंटिरिअर बद्दल काही माहिती समोर आली आहे. त्यानंतर असा अंदाज लावला जात होता की ही कार लवकरच लाँच केली जाऊ शकते.
टाटा अल्ट्रोज बाजारात प्रीमियम हॅचबॅक कार सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. या सेगमेंटमध्ये, ही कार Maruti Baleno, Hyundai i20 आणि Toyota Glanza सारख्या कारशी स्पर्धा करते.