श्रीनगर : कोरोनाकाळात (Corona) मागील दोन वर्षांपासून अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) रद्द करण्यात आली होती. मात्र, आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी होत असलेल्या बाबा बर्फानी (Baba Barfani) यांच्या यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. यंदाची अमरनाथ यात्रा ४३ दिवस चालणार आहे. आजपासून सुरु झालेल्या यात्रेची सांगता ११ ऑगस्ट रोजी होणार आहे.
अमरनाथ यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ (CRPF) जवान आणि प्रशासन सतर्क झाले आहे. पहलगाम बेस कॅम्पवर (Pahalgam Base Camp) सुमारे १० हजार यात्रेकरु पोहोचले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) अलिकडे तणावाचे वातावरण असल्याने जम्मू-काश्मीर प्रशासन आणि पोलीस प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलत आहे.
#WATCH जम्मू-कश्मीर: बालटाल में अमरनाथ यात्रा के लिए श्रद्धालुओं का पहला जत्था पवित्र गुफा के रास्ते से रवाना हुआ। pic.twitter.com/hm0bzRyEfw — ANI_HindiNews (@AHindinews) June 30, 2022
यात्रेसाठी पोलिसांकडून सुरक्षेचा आराखडा तयार करण्यात आला असून अतिरिक्त जवानही तैनात करण्यात आले आहेत. पहलगाम आणि बालटाल येथील बेस कॅम्पमधून दररोज सुमारे १० हजार भाविक बाबा बर्फानी यांच्या दर्शनाला पोहोचणार आहेत. यात्रेला मोठा जनसागर लोटण्याची शक्यता असल्याने दहशतवादाचे सावट आहे.