दर 2 तासांनी पाठवा 'हा' अहवाल, कोलकाता घटनेनंतर गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय
कोलकात शहरात एक घटना घडली अन् देश हादरला. कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर लैंगिक अत्याचारकरुन हत्या केल्याप्रकरणी देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. अनेक भागात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. तसंच डॉक्टरही संपावर गेले आहेत. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना एक आदेश जारी केला आहे. राज्यातील दर दोन तासांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा: कोलकातामध्ये आणखी एका मुलीवर लैंगिक शोषणाचा प्रयत्न! तीन भामट्याना नागरिकांनी घेतलं ताब्यात
केंद्रीय गृहमंत्रालय आणि अमित शहा यांनी स्वतः कोलकाता येथील एका डॉक्टरच्या लैंगिक अत्याचार आणि हत्याप्रकरणाचासीबीआय तपास आणि आरजी कार हॉस्पिटलशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या घटना आणि देशभरात सुरू असलेल्या निदर्शने यांच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे. आरजी कार हॉस्पिटलमध्ये झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांवर उठलेले प्रश्न आणि हायकोर्टाच्या प्रतिकूल प्रतिक्रियांनंतर गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. एमएचएने सर्व राज्यांच्या पोलिस दलांना कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीचा अहवाल ‘दर दोन तासांनी’ देण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यांमधील वाढत्या गुन्हेगारी लक्षात घेता, गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आदेश जारी केले आहेत. कोलकाता बलात्कार आणि हत्येनंतर गृह मंत्रालयाने भारतातील सर्व पोलीस दलांना अधिसूचना जारी केली आहे. या सरकारी आदेशात, सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान, त्यांना त्यांच्या ठिकाणच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा अहवाल दर दोन तासांनी केंद्राला ईमेल/फॅक्स/व्हॉट्सॲपद्वारे पाठवण्यास सांगण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
हे सुद्धा वाचा: महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरोधात कल्याणमधील डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद
मृत महिला डॉक्टरच्या शवविच्छेदन अहवालातून हत्येचे प्रकार आणि लैंगिक अत्याचार उघड झाल्याने देशभरात संताप व्यक्त होत आहे. पीडितेची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचेही अहवालात लिहिले आहे. त्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. आरोपीने दोनदा तिचा गळा आवळून खून केला होता. पहाटे 3 ते 5 च्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. आयएमए आणि फोर्डाच्या आवाहनावर ओपीडीवर बहिष्कार टाकून देशव्यापी निदर्शने सुरू आहेत. अशा परिस्थितीत कोलकाता येथील आरजी कार रुग्णालयासारखी घटना इतरत्र कुठेही घडू नये यासाठी गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
सीबीआयने आरजी कार हॉस्पिटलच्या माजी प्राचार्याच्या चौकशीची व्याप्ती वाढवली आहे. विशेष म्हणजे 8-9 ऑगस्टच्या मध्यरात्री आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला डॉक्टरसोबत क्रूरतेची परिसीमा ओलांडण्यात आली होती. कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरचा लैंगिक छळ करण्यात आला. सेमिनार हॉलमध्ये त्याचा मृतदेह सापडला तेव्हा त्याच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा होत्या.