Amit Shah Retirement Plan News in Marathi : भारतात राजकारण्यांसाठी निवृत्तीचे कोणतेही वय निश्चित करण्यात आले नाही. काहीजण लवकर निवृत्त होतात, तर काहीजण वयाच्या शेवटपर्यंत राजकारणात सक्रीय राहतात. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवृत्तीबाबत मोठे विधान केले आहे. अमित शहा यांनी अहमदाबादमधील एका कार्यक्रमात सांगितले की, निवृत्तीनंतर ते पुढील आयुष्यात काय करणार आहेत. राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर, मी आयुष्यभर नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच निवृत्तीनंतर संपूर्ण आयुष्य वेद, उपनिषद वाचण्यात वेळ घालवणार असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सांगितले की, सार्वजनिक जीवनातून निवृत्त झाल्यानंतर मी स्वतःला पूर्णपणे वेद, उपनिषद आणि नैसर्गिक शेतीसाठी समर्पित करण्याची योजना आखत आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सहकारी संस्थांशी संबंधित महिलांसोबत ‘सहकार-संवाद’ मध्ये बोलताना अमित शहा यांनी हे सांगितले.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांची निवृत्ती योजना सांगितली आहे. बुधवारी दिल्लीत आयोजित ‘सहारा संवाद’ दरम्यान त्यांनी सांगितले की, मी निवृत्तीनंतर माझे उर्वरित आयुष्य वेद, उपनिषदे आणि नैसर्गिक शेतीच्या अभ्यासासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात, राजस्थानमधील सहकारी कामगार आणि महिलांशी झालेल्या संवादादरम्यान त्यांनी हे सांगितले. ‘मी निश्चय केला आहे की जेव्हा जेव्हा मी निवृत्त होईन तेव्हा मी माझे उर्वरित आयुष्य वेद, उपनिषदे आणि नैसर्गिक शेतीसाठी घालविणार आहे.
नैसर्गिक शेती हा एक वैज्ञानिक प्रयोग आहे, जो अनेक फायदे देतो. खतासोबत गहू खाल्ल्याने कर्करोग होतो. रक्तदाब वाढतो आणि साखरेसारख्या समस्या उद्भवतात. जर तुम्ही नैसर्गिक शेती केली तर उत्पादनही वाढते. अमित शहा म्हणाले की, मी माझ्या शेतात नैसर्गिक शेतीचा अवलंब केला आहे आणि उत्पादनात दीड पट वाढ झाली आहे. नैसर्गिक शेतीमध्ये पाण्याचा एक थेंबही वाया जात नाही,अशी माहिती अमित शाह यांनी दिली. तसेच रासायनिक खतांनी पिकवलेला गहू अनेक आरोग्य समस्या निर्माण करू शकतो, तर नैसर्गिक शेती शरीराला रोगमुक्त ठेवण्यास मदत करते, असे ते म्हणाले.
यावेळी अमित शहा यांनी सहकारी महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली. कार्यक्रमादरम्यान अमित शहा यांनी देशातील सहकारी क्रांतीचा उल्लेख केला. गुजरात बनासकांठाचे उदाहरण देताना ते म्हणाले, ‘माझा जन्म झाला तेव्हा बनासकांठात आठवड्यातून एकदाच आंघोळीसाठी पाणी उपलब्ध होते. बनासकांठ आणि कच्छ हे गुजरातमधील सर्वात जास्त पाण्याचे दुर्भिक्ष असलेले जिल्हे होते. आज तिथले एक कुटुंब केवळ दुधाच्या उत्पादनातून दरवर्षी १ कोटी रुपये कमवत आहे. हा एक मोठा बदल आहे. अमित शहा म्हणाले की, जर तुम्ही नैसर्गिक शेती केली तर पावसाचे पाणी अजिबात वाया जाणार नाही.
अधिक खत टाकल्याने जमिनीत गांडुळे तयार होत नाहीत आणि इतर कीटक नष्ट होतात. एका देशी गायीने तीस एकर जमीन लागवड करता येते. गुजरातमध्ये सरकार गायीच्या देखभालीसाठी दरमहा ९०० रुपये देते. यामुळे उत्पादन वाढते, आरोग्य चांगले राहते आणि जमीन निरोगी राहते. नैसर्गिक शेती आपल्यासाठी सर्व प्रकारे फायदेशीर आहे. भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाने नैसर्गिक शेतीचे उत्पादन खरेदी करण्यासाठी समित्या स्थापन केल्या आहेत. त्याच्या निर्यातीसाठीही समित्या स्थापन केल्या आहेत. नैसर्गिक शेतीमध्येही शेणाचा वापर केला जातो, तर लोक ते तसेच फेकून देतात.
तसेच जेव्हा मी गृहमंत्री झालो तेव्हा लोक मला म्हणायचे की तुम्हाला एक मोठे खाते मिळाले आहे. सरदार पटेलही या पदावर होते, त्यामुळे ही मोठी गोष्ट आहे, परंतु ज्या दिवशी मला सहकार मंत्री बनवण्यात आले, तेव्हा मला जाणवले की हे गृहमंत्र्यांपेक्षा मोठे पद आहे. या दरम्यान त्यांनी सहकारी कार्यकर्त्यांना सांगितले की तुम्ही लोक मला कधीही भेटू शकता.