Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्नाटकात ‘अमूल’ विरुद्ध ‘नंदिनी’ संघर्ष आणखी भडकणार?; पण नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या…

कर्नाटकात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसे राजकीय वातावरण तापल्याचे पाहिला मिळत आहे. त्यात आता कर्नाटकात (Karnataka Election) अमूल (Amul) आणि नंदिनी (Nandini Milk) दुधाच्या ब्रँडची तुलना केली जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 11, 2023 | 06:42 PM
कर्नाटकात ‘अमूल’ विरुद्ध ‘नंदिनी’ संघर्ष आणखी भडकणार?; पण नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या…
Follow Us
Close
Follow Us:

बंगळुरू : कर्नाटकात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसे राजकीय वातावरण तापल्याचे पाहिला मिळत आहे. त्यात आता कर्नाटकात (Karnataka Election) अमूल (Amul) आणि नंदिनी (Nandini Milk) दुधाच्या ब्रँडची तुलना केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) यांनी नंदिनी दुधाचा ब्रँड हा अमूलपेक्षा चांगला असल्याचे म्हटले आहे. पण सत्ताधारी भाजप अमूल हा ब्रँड कर्नाटकात आणू पाहत आहे.

कर्नाटकच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दुधाचा मुद्दा पेटताना दिसत आहे. कर्नाटकात अमूल दुधाच्या एंट्रीमुळे काँग्रेस आणि जेडीएसने कर्नाटक दूध महासंघाच्या नंदिनी ब्रँडला विशेष महत्त्व दिले आहे. कर्नाटकातील जनतेला सध्या ‘नंदिनी’चे मिळणारे स्वस्त दूध काढून घेऊन अमूलचे महागडे दूध आणले जात असल्याचा आरोप काँग्रेसमधील नेत्यांनी केला आहे. याबाबत कर्नाटक दूध महासंघाचे एस. एन. कुमार यांनी म्हटले की, ‘सध्या कर्नाटकातील लोकांना इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात स्वस्त दूध मिळत आहे. कर्नाटकात अमूलची एन्ट्री करून भाजप सरकार लोकांना महागाईकडे ढकलण्याचे काम करत आहे. आजही संपूर्ण देशात सर्वात स्वस्त दूध फक्त कर्नाटकातच मिळते, असा त्यांचा दावा आहे.

काँग्रेस, जेडीएसचा हल्लाबोल

दुधाच्या मुद्द्यावरून कर्नाटकातील तापलेल्या राजकारणावरून काँग्रेसने नाही तर जेडीएसनेही भाजपवर हल्लाबोल केला. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी विरोध केला. ते म्हणाले की, भाजपचे डबल इंजिन सरकार केवळ कर्नाटकातील शेतकऱ्यांचीच गळचेपी करत नाही. तर कर्नाटकात अमूलच्या प्रवेशाने कन्नडिगांच्या स्वाभिमानाशी आणि अस्मितेशीही खेळत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

‘अमूल’कडून टीझर लाँच

कर्नाटक मिल्क फेडरेशन (केएमएफ) राज्यात ‘नंदिनी’ या ब्रँड नावाने दूध आणि दही विक्री करते. अमूलने बंगळुरूमध्ये आपल्या ब्रँडचा टीझर लाँच केला. ज्यामध्ये अमूल आपल्या दुग्धजन्य पदार्थांचे वितरण सक्षम करण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करेल. अमूलच्या कर्नाटकप्रवेशामुळे स्थानिक ब्रँडला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Amul milk vs nandini milk happened in karnataka know what is issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2023 | 06:42 PM

Topics:  

  • Amul Milk
  • Karnataka

संबंधित बातम्या

IPL 2026 : RCB Vs SRH सामन्यापूर्वी कर्नाटक आमदाराची VIP ट्रीटमेंटची मागणी, म्हणाले, “लाईनमध्ये उभं राहणार नाही…”
1

IPL 2026 : RCB Vs SRH सामन्यापूर्वी कर्नाटक आमदाराची VIP ट्रीटमेंटची मागणी, म्हणाले, “लाईनमध्ये उभं राहणार नाही…”

चालू वर्गात प्रोफेसरने विद्यार्थिनीला घातली लग्नाची मागणी, संतप्त होऊन तिने थेट चप्पलांनी दिलं उत्तर; घटनेचा Video Viral
2

चालू वर्गात प्रोफेसरने विद्यार्थिनीला घातली लग्नाची मागणी, संतप्त होऊन तिने थेट चप्पलांनी दिलं उत्तर; घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.