लडाख : केंद्रशासित लडाखमध्ये शनिवारी सायंकाळी भारतीय लष्कराच्या (Army Vehicle Accident) वाहनाला अपघात झाला. राजधानी लेहनजीक असलेल्या क्यारी गावात सैन्याचे एक वाहन दरीत कोसळले. या दुर्घटनेत नऊ जवान शहीद (9 Jawan Martyr) झाले असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. शहीद जवानांमध्ये आठ जवान आणि एका जेसीओचाही समावेश आहे.
जवानांचे हे गस्ती पथक क्यारी गावाकडे जात असताना सात किलोमीटर आधीच ही दुर्घटना घडली. या घटनेत अन्य जवानही जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत अनेक जवान जखमी झाले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच बचावपथक घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत एक जवान गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गस्ती पथकात तीन वाहनांचा समावेश होता. त्यापैकी एक वाहन दरीत कोसळले. या वाहनात तीन अधिकारी, दोन जेसीओ आणि 34 जवान होते. तीनही वाहनांच्या ताफ्यात एक जिप्सी, एक ट्रक आणि एक अॅम्बुलन्सदेखील होती. लडाखमधील ज्या भागात हा अपघात झाला तो दुर्गम भाग असून क्यारी हे गाव प्रत्यक्ष नियंत्रण रेषे (एलओसी) नजीक आहे.