Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधार लिंक करताच १.८८ कोटी शेतकरी ६ हजार रुपये लाभाच्या योजनेतून बाहेर

आधार लिंक करण्याची चौथी डिजिटल चाळणी लावताच लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या गेल्या सहा महिन्यांत १.८६ कोटी कमी झाली. ११ व्या हप्त्यावेळी या योजनेचा लाभ १०.४५ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळाला. १२ व्या हप्त्यावेळी शेतकऱ्यांची संख्या घटून ती ८.५८ कोटी झाली. उत्तर प्रदेशात या चौथ्या चाळणीमुळे ५८ लाख शेतकरी कमी झाले.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 07, 2022 | 06:16 PM
आधार लिंक करताच  १.८८ कोटी शेतकरी ६ हजार रुपये लाभाच्या योजनेतून बाहेर
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र सरकारने १२ वा हप्ता जमा करण्याच्या आधी शेतकऱ्यांचा डेटा ‘स्वच्छ’ करण्यासाठी आधार लिंक करण्याची चौथी डिजिटल चाळणी लावताच लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या गेल्या सहा महिन्यांत १.८६ कोटी कमी झाली. ११ व्या हप्त्यावेळी या योजनेचा लाभ १०.४५ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळाला. १२ व्या हप्त्यावेळी शेतकऱ्यांची संख्या घटून ती ८.५८ कोटी झाली. उत्तर प्रदेशात या चौथ्या चाळणीमुळे ५८ लाख शेतकरी कमी झाले. पंजाबमध्ये ही संख्या १७ लाखांवरून २ लाखांवर आली. पाच राज्ये अशी आहेत जेथे ही संख्या १० ते १५ लाखांपर्यंत कमी झाली आहे. दुसरीकडे इतक्याच राज्यांत लाभार्थी वाढले आहेत.

प्रत्यक्षात, कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांचा डेटा पारदर्शक करण्यासाठी आधीच तीन चाळण्या लावल्या होत्या. मात्र आधार लिंक्ड पेमेंटची चौथी चाळणी लावल्यानंतर लाभार्थींची संख्या घटत गेली. योजनेत पारदर्शकता आणणे आणि अपात्र शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी लागू करण्यात आली असून, आधार पेमेंट ब्रिजद्वारे रक्कम दिली जाते. शेतकऱ्यांची संख्या कमी होत असल्याने केंद्राने राज्यांसोबत मिळून गावागावांत पथके पाठवण्यास सांगितले आहे, जेणेकरून खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नयेत.

या ४ संस्था पटवत आहेत ओळख पीएफएमएस, यूआयडीएआय, आयटी, एनपीसीआय शेतकऱ्यांचा डेटा राज्य सरकार देते. पीएम किसान पोर्टलवर यादी अद्ययावत होते. हा डेटा पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम (पीएफएमएस) व आधार क्रमांकाच्या खात्रीसाठी यूनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाला (यूआयडीएआय) पाठवला जात आहे. डेटाची तपासणी आयकर विभागही (आयटी) करतो, जेणेकरून त्यांच्या कक्षेत येणाऱ्या शेतकऱ्यांची ओळख पटावी. बँक खाते आधारला जोडल्याची खात्री करण्यासाठी डेटा नॅशनल पेमेंट कार्पो. (एनपीसीआय) ला पाठवला जातो.

४ चाळण्या : बनावट लाभार्थी ओळखण्याच्या {जमिनीचे रेकॉर्ड आधारशी जोडून पाहिले जात आहे. {डेटा यूआयडीएआय सर्व्हरवर पाठवून ओळख पटवली जात आहे. {लाभार्थीच्या बँक खात्याचे प्रमाणीकरण, शेतकऱ्याचा डेटा आणि बँक खाते दोन्ही खरे आहेत. {बँक खाते प्रमाणित झाल्यानंतर एनपीसीआयद्वारे आधार लिंक्ड पेमेंट केले जात आहे.

Web Title: As soon as aadhaar is linked 1 88 crore farmers out of the rs 6000 benefit scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2022 | 06:16 PM

Topics:  

  • PM Kisan Scheme

संबंधित बातम्या

PM Kisan Maandhan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! योजनेचा हप्ता वाढेल? सरकारने दिली ‘ही’ माहिती
1

PM Kisan Maandhan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! योजनेचा हप्ता वाढेल? सरकारने दिली ‘ही’ माहिती

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी मिळणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता
2

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी मिळणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता

PM Kisan: पीएम किसानसंबंधित करोडो शेतकऱ्यांसाठी आला मोठा मेसेज, सरकारने X वर दिली माहिती
3

PM Kisan: पीएम किसानसंबंधित करोडो शेतकऱ्यांसाठी आला मोठा मेसेज, सरकारने X वर दिली माहिती

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लवकरच PM किसान योजनेचा २० वा हफ्ता येणार? वाचा सविस्तर
4

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लवकरच PM किसान योजनेचा २० वा हफ्ता येणार? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.