Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी मिळणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता

PM Kisan Yojana: 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत 19 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 3.69 लाख कोटी रुपये हस्तांतरित झाले आहेत. 20व्या हप्त्यात 9.7 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 20,500 कोटी रुपये वितरित

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Jul 31, 2025 | 06:25 PM
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी मिळणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी मिळणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

PM Kisan Yojana Marathi News: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता येत्या 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित केला जाणार आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत 2 ऑगस्ट रोजी वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीबाबत आणि अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली.

देशभरातील 731 कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके), भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि कृषी विद्यापीठांचे संचालक, कुलगुरू आणि प्रमुख दूरद्श्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले.

सन फार्माच्या तिमाही निकालानंतर शेअर्सची किंमत घसरली, नफा २० टक्के घसरून २,२७८ कोटी रुपयांवर

केंद्रीय मंत्री चौहान यांनी राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि ग्रामीण स्तरावर शेतकऱ्यांना या कार्यक्रमाशी जोडण्यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आणि देशव्यापी स्तरावर मोहिमेच्या स्वरूपात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी रूपरेषा तयार करण्याचे निर्देश दिले. कृषी विज्ञान केंद्रांना तयारीबाबत मार्गदर्शन करताना केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली 6,000 रुपयांची रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.

प्रत्येक चार महिन्यांनी एक हप्ता वितरित केला जातो. यामुळे शेतकऱ्यांपर्यंत थेट लाभ पोहोचवण्याची संधी मिळते. यात केव्हीके यांची महत्त्वाची भूमिका आहे. यंदाही केव्हीके यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, यासाठी तयारीला सुरुवात करावी. हा कार्यक्रम शेतकऱ्यांपर्यंत थेट लाभ पोहोचवण्याबरोबरच जनजागृती मोहिमेचे माध्यम आहे, त्यामुळे हा कार्यक्रम उत्सव आणि मिशनच्या स्वरूपात आयोजित व्हावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

2 ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता वितरणाच्या कार्यक्रमात शेतकरी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. हा कार्यक्रम शेतकऱ्यांना लाभ आणि कृषी क्षेत्रातील विकास योजनांशी जोडण्याची संधी आहे. कृषी सखी, ड्रोन दीदी, बँक सखी, पशु सखी, विमा सखी आणि ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या माध्यमातून कार्यक्रमाची माहिती द्यावी.

खरीप हंगामाशी संबंधित विषयांवर शेतकऱ्यांशी संवाद साधला जाऊ शकतो. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहभागाने हा कार्यक्रम यशस्वी करून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी कटिबद्धतेने काम करावे, असेही त्यांनी नमूद केले.

2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत 19 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 3.69 लाख कोटी रुपये हस्तांतरित झाले आहेत. 20व्या हप्त्यात 9.7 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 20,500 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत.

या बैठकीत कृषी सचिव देवेश चतुर्वेदी, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. एम. एल. जाट आणि कृषी मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मेटल आणि फार्मा शेअर्समध्ये विक्रीमुळे शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स २९६ अंकांनी घसरला

Web Title: Good news for farmers the 20th installment of the pradhan mantri kisan samman nidhi yojana will be available on this day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 06:25 PM

Topics:  

  • Business News
  • PM Kisan Scheme
  • PM Kisan Yojana

संबंधित बातम्या

Income Tax Notice 2025: बँक खात्यात 10 लाख? आयकर विभाग पाठवू शकते नोटीस, वाचण्याची पद्धत
1

Income Tax Notice 2025: बँक खात्यात 10 लाख? आयकर विभाग पाठवू शकते नोटीस, वाचण्याची पद्धत

Silver Jewellery New Rule: 1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवर होणार नवा नियम लागू, खऱ्याखोट्याची त्वरीत ओळख पटणार
2

Silver Jewellery New Rule: 1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवर होणार नवा नियम लागू, खऱ्याखोट्याची त्वरीत ओळख पटणार

Bonus Share: याला म्हणतात शेअर…! 3 शेअरवर 1 शेअर फ्री, याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
3

Bonus Share: याला म्हणतात शेअर…! 3 शेअरवर 1 शेअर फ्री, याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?

8th Pay Commission: सरकारी कामगारांना 2028 पर्यंत पहावी लागणार वाट, 7 वा वेतन आयोग मिळायला लागला होता ‘इतका’ वेळ
4

8th Pay Commission: सरकारी कामगारांना 2028 पर्यंत पहावी लागणार वाट, 7 वा वेतन आयोग मिळायला लागला होता ‘इतका’ वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.