chandrashekhar azad ravan
सहारनपूर: भीम आर्मीचे (Bhim Army) संस्थापक, अध्यक्ष चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. (Chandrashekhar Azad Ravan) उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील देवबंद परिसरात हा प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात आझाद जखमी झाले असून त्यांना स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.(Attack On Chandrashekhar Azad Ravan) या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले आहेत.
Bhim Army leader and Aazad Samaj Party – Kanshi Ram chief, Chandra Shekhar Aazad taken to a hospital in Saharanpur, Uttar Pradesh after his convoy was attacked by a few armed men and a bullet brushed past him. Details awaited. https://t.co/TDVzdFGUDa pic.twitter.com/URJCGGAOiU
— ANI (@ANI) June 28, 2023
कारचा दरवाजा आणि सीटला छेदून गोळी आरपार गेली. हल्लेखोरांच्या गाडीचा नंबर हरियाणाचा असल्याची माहिती मिळाली आहे.
Uttar Pradesh | Chandra Shekhar Aazad, national president of Aazad Samaj Party – Kanshi Ram and Bhim Army leader’s convoy attacked by armed men in Saharanpur.
SSP Dr Vipin Tada says, “Half an hour back, the convoy of Chandra Shekhar Aazad was fired at by a few car-borne armed… pic.twitter.com/RUoh15yYWY
— ANI (@ANI) June 28, 2023
दरम्यान एसएसपी डॉ. विपिन टाडा यांनी याविषयी सांगितलं की, अर्ध्या तासापूर्वी चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर गाडीतून शस्रांसह आलेल्या काही लोकांनी गोळीबार केला. गोळी त्यांना चाटून गेली. त्यांची प्रकृती आता ठिक आहे. सीएचसीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस या हल्ल्याचा पुढील तपास करत आहेत.