लाच प्रकरणी महिला पोलिस अंमलदारासह सहायक फौजदारावर कारवाई
लखनौ : उत्तर प्रदेशातील बिजली बांबा चौकीतील एक लाचप्रकरण समोर आले. याठिकाणी तैनात असलेल्या एका पोलीस निरीक्षकाने चोरीच्या प्रकरणात २५००० रुपयांची लाच मागितल्याचा ऑडिओ व्हायरल झाला होता. शुक्रवारी रात्री उशिरा हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एसएसपी डॉ. विपिन ताडा यांनी निरीक्षकाला निलंबित केले. तपास एसपी सिटीकडे सोपवण्यात आला आहे.
शुक्रवारी बिजली बांबा चौकीत तैनात असलेल्या २०२३ बॅचच्या निरीक्षक अभिषेक जयस्वाल यांनी चोरीच्या प्रकरणात एका तरुणाकडून २५००० रुपयांची लाच मागितल्याचा ऑडिओ व्हायरल झाला. बिजली बांबा चौकीचे प्रमुख अनेक तास प्रकरण सोडवण्यात व्यस्त होते. व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये, निरीक्षक प्रकरणाच्या तपासाच्या अहवालासाठी २५००० रुपयांची मागणी करत होते. मात्र, या प्रकरणाचा ऑडिओ व्हायरल झाला. हा ऑडिओ व्हायरल होताच वरिष्ठ पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आणि पोलिसाला निलंबित केले.
दरम्यान, पुण्यातील पिंपरीत दाखल गुन्ह्यात आरोपीला अटक न करण्यासाठी तसेच दोषारोपपत्रात आरोपीला फायदा होईल, अशा त्रुटी ठेवून दोषारोपपत्र पाठविण्यासाठी लाच घेणाऱ्या महिला पोलिस अंमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. तसेच सहायक फौजदारावरही कारवाई करण्यात आली. ही कारवाई रावेत पोलिस ठाणे येथे शुक्रवारी (ता. १८) करण्यात आली.
पिंपरीतील रावेतमध्ये समोर आले प्रकरण
रावेत पोलिस ठाण्यातील राजश्री रवी घोडे असे महिला अंमलदाराचे नाव असून राकेश शांताराम पालांडे असे सहायक फौजदाराचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार वकील असून त्यांच्या आशिलावर रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास राजश्री घोडे यांच्याकडे आहे. दरम्यान, या गुन्ह्यात आरोपीला अटक न करण्यासाठी तसेच त्याच्याविरुद्ध दाखल होणाऱ्या दोषारोपपत्रात आरोपीस फायदा होईल, अशा त्रुटी ठेवून दोषारोपपत्र पाठविण्यातही राजश्री घोडे यांनी तक्रारदाराकडे पन्नास हजारांची लाच मागितली.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केली असता राजश्री घोडे यांनी सुरुवातीस 50 हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती तीस हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.