Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘९९% सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, स्वतःच्या जातीतील, वर्गातील लोकांनाच संधी’; बाबा रामदेवांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलनाचा इशारा

सरकारी नोकऱ्यांमधील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचारावर बाबा रामदेव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारी भरतीच्या मुलाखतींमध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफेरी होत असल्याचा आरोप करत परिस्थिती सुधारली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

  • By विवेक
Updated On: Aug 15, 2026 | 06:39 PM
baba ramdev

baba ramdev

Follow Us
Follow Us:
  • सरकारी नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचा बाबा रामदेवांचा आरोप
  • भरतीच्या मुलाखतींमध्ये लाचखोरी आणि शिफारशीचा दावा
  • परिस्थिती सुधारली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
 

नवी दिल्ली : नुकतेच NEET पेपरफुटीवरून देशभरात कॉकरोच जनता पार्टीकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. देशातील एकूण शिक्षण पद्धतीवरून सोनम वांगचुक, अभिजित दिपके यांच्यासह अनेक Gen-Z आंदोलकांकडून यशस्वी आंदोलन करण्यात आले. आता पुन्हा एकदा सरकारी नोकऱ्यांमधील कथित अनियमितता आणि भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांच्या मुद्द्यावर आंदोलन पेटण्याची शक्यता असून योगगुरु बाबा रामदेव यांनी यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारी नोकरीच्या मुलाखतींमध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफेरी होत असल्याचा आरोप करत त्यांनी परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाबा रामदेव यांनी सरकारी भरती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. काही ठिकाणी विशिष्ट जात, वर्ग किंवा संघटनेशी संबंधित उमेदवारांना झुकते माप दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. इतर पात्र उमेदवारांना मात्र डावलले जात असल्याचेही ते म्हणाले.

मुलाखतींच्या प्रक्रियेवर गंभीर सवाल

सरकारी नोकरीच्या भरतीमध्ये मुलाखतीचा टप्पा महत्त्वाचा असतो. मात्र याच प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला. लाचखोरी आणि शिफारशीच्या तक्रारी समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. ९० ते ९९ टक्के सरकारी नोकरीच्या मुलाखतींमध्ये हेराफेरी होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

Independence Day 2026 : तुटलेल्या खिडक्या, अस्वच्छ शौचालये अन्.. ; गावची शाळा पाहून अभिजीत दिपकेंची नाराजी

स्वतःच्या गटातील, जातीत किंवा वर्गातील व्यक्तींना संधी देऊन इतरांना बाजूला करण्याची पद्धत न्याय्य नसल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले. भरती प्रक्रियेत पैशांचा वापर होत असेल तर त्यावर कठोरपणे नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षण व्यवस्थेतील समस्यांकडेही लक्ष

सरकारी नोकऱ्यांबरोबरच शाळा आणि महाविद्यालयांमधील सुविधांच्या प्रश्नावरही बाबा रामदेव यांनी भाष्य केले. अनेक विद्यार्थी वीज, पाणी आणि पुस्तकांसारख्या मूलभूत सुविधांच्या कमतरतेबाबत तक्रारी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

परीक्षेत उत्तीर्ण होऊनही विद्यार्थ्यांच्या दहावी-बारावीच्या गुणांना अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. निवड प्रक्रिया प्रामुख्याने स्पर्धात्मक परीक्षांवर आधारित असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘परिस्थिती सुधारली नाही तर आंदोलन’

देशातील भ्रष्टाचार आणि अस्वस्थतेवर चिंता व्यक्त करताना बाबा रामदेव यांनी आपण अराजकतेचे समर्थन करत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत, असे ते म्हणाले.

CJPच्या ‘School Thik Karo’ मोहीमेला आजपासून सुरुवात; ग्रामीण भागातील शाळांमध्ये घडणार मोठा बदल

सरकारी नोकऱ्यांमधील व्यवस्थेत सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर राजकीय पक्षांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रीय हितासाठी एकत्र काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. देशाच्या हितासाठी संघर्ष करताना परस्पर द्वेष टाळावा आणि सकारात्मक कामांचे कौतुक करावे, असेही बाबा रामदेव यांनी सांगितले.

Web Title: Baba ramdev government jobs corruption allegation protest warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • Baba Ramdev
  • government jobs
  • Protest

संबंधित बातम्या

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा;  शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी
1

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा; शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC UG भरती २०२६ अंतर्गत १,६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
2

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC UG भरती २०२६ अंतर्गत १,६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Sports Quota:  क्रीडापटूंसाठी खूशखबर! CRPF मध्ये ५२१ जागांवर भरती; कोणतीही लेखी परीक्षा नाही
3

Sports Quota: क्रीडापटूंसाठी खूशखबर! CRPF मध्ये ५२१ जागांवर भरती; कोणतीही लेखी परीक्षा नाही

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
4

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.