
16 नोव्हेंबरपासून बंद होणार बद्रीनाथचे दरवाजे
येत्या 12 नोव्हेंबरपासून बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद करण्याची विधिवत प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सर्व विधी आणि धार्मिक प्रकिर्या पूर्ण झाल्यावर 16 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजून 38 मिनिटांनी बद्रीनाथ धामचे दरवाजे हिवाळ्याच्या काळासाठी अधिकृतपणे बंड केले जाणार आहेत. श्री बद्रीनाथ धामचे कपाट बंद होण्यास अवघे काही दिवस उरल्याने देशभरातून हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत. यामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर, विशेषतः जोशीमठपासून पुढे मारवाडी आणि विष्णुप्रयाग दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी झाली असल्याचे म्हटले जात आहे.
Badrinath : बद्रीनाथ धामचा नवा विक्रम, 18.67 लाख पेक्षा जास्त भाविकांनी घेतले दर्शन
हे सर्व धार्मिक विधी आणि पंच पूजा बद्रीनाथ धामचे रावळ अमरनाथ नंबूदरी, नायब रावळ सूर्यराग नंबूदरी, धर्माधिकारी आचार्य स्वयंबर सेमवाल, वेदपाठी रवींद्र भट, आचार्य वाणी विलास डिमरी आणि अमित बंदोलिया यांच्या हस्ते पार पडतील.या ऐतिहासिक क्षणी बद्री-केदार मंदिर समितीचे (BKTC) अध्यक्ष हेमंत द्विवेदी, उपाध्यक्ष ऋषी प्रसाद सती, विजय कप्रवाण यांच्यासह समितीचे प्रमुख अधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
Ans: श्री बद्रीनाथ धाम उत्तराखंड राज्यात चमोली जिल्ह्यात आहे.
Ans: श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे 16 तारखेला रात्री ९ वाजून ३७ बंद होणार आहेत.