Badrinath : बद्रीनाथ धामचा नवा विक्रम, 18.67 लाख पेक्षा जास्त भाविकांनी घेतले दर्शन, सौजन्य : आयएएनएस
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धाम (Badrinath) तिर्थक्षेत्राने नवा विक्रम रचला आहे. येथे आतापर्यंत 18.67 लाख पेक्षा जास्त भाविकांनी भगवान बद्री विशालच्या पवित्र धामाचे दर्शन घेतले आहे.
भाविकांच्या संख्येने 2023 मधील 18.39 लाख भक्तांच्या दर्शनाचा विक्रम मोडीत काढला आहे. बद्रीनाथ धाम येथे येणाऱ्या भक्तांची संख्या सलग वाढत असून यावर्षीय ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच जुना विक्रम मोडीत पडला आहे.
तिर्थयात्रेतील लोकांच्या मोठ्या गर्दीला पाहता अपेक्षा आहे की, या वर्षी मंदिरात येणाऱ्या भक्तांची संख्या 20 लाखांचा आकडा पार करेल. जस जसे भाविकांची संख्या वाढत आहे, अधिकारी व प्रशासन स्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे.
रविवारी 14,000 पेक्षा जास्त भक्त बद्रीनाथ धाममध्ये पोहचले व भगवान बद्री विशालची पूजा-अर्चना केली. तिर्थयात्रिंच्या सलग येण्याने मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर गाड्या व लोकांची गर्दी वाढू लागली आहे.
Rajysabha Election : भाजपने UP मधील 8 उमेदवारांची यादी केली जाहीर, दोन महिलांचा समावेश
याअगोदर 2023 साली एकूण 18.39 लाख भाविकांनी बद्रीनाथ धामचे दर्शन घेतले होते, जे त्यावेळी मंदिरात येणाऱ्या लोकांची सर्वात जास्त संख्या होती. दरम्यान, या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात हा आकडा पार झाला आहे. त्यामुळे भाविकांचा नवा रेकॉर्ड नोंदवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भक्तांच्या संख्येत सलग होणारी वाढ पाहता अपेक्षा वर्तवण्यात येत आहे की, बद्रीनाथ यात्रा या वर्षी आणखीन एक नवा अध्याय निर्माण करील. अशाच प्रकारे येथे भक्त येत राहिले तर आगामी काळात येथे येणाऱ्या भाविकांची संख्या 20 लाखांचा आकडा पार करेल.
तिर्थयात्रेतील प्रत्येक घडामोडीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. भक्तांच्या सुरक्षिततेला जास्त प्राधान्य दिले जात आहे. रुद्रप्रयाग, चमोली आणि उत्तरकाशी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला 24 तास हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. हे जिल्हे चार धाम यात्रा मार्गाशी निगडीत महत्त्वाचे जिल्हे आहेत.
दरम्यान, तिर्थयात्रेतील भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे बद्रीनाथ राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम सारख्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मंदीरपर्यंत पोहचण्यासाठी भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.






