बंगळुरु : देशभरात गणेशोत्सवाची (Ganeshotsav) सगळीकडे धामधूम सुरू आहे. गणरायाच्या आगमनाला अवघे काही तास उरले आहेत. अशातच बंगळुरु महापालिकेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बंगळुरुत (Banglore) म्हणजे 31 ऑगस्टला गणेश चतुर्थीला मांस विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
[read_also content=”तळीरामांच्या कामाची बातमी! पुण्यात ‘या’ दिवशी ड्राय डे https://www.navarashtra.com/maharashtra/dry-day-in-pune-due-to-ganesh-festival-nrps-320725.html”]
[blurb content=””] त्यामुळे गणेश चतुर्थीला पालिका हद्दीतील मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत.या निर्णयावरून वाद होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या आदेशावर MIM खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रीया दिली असून, महापालिकेचा हा निर्णय घटनाबाह्य असल्याचं त्यांनी म्हण्टलयं. कर्नाटक सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
[read_also content=”गणपतीसाठी बनवा खास ओरीओ बिस्कीटांचे मोदक https://www.navarashtra.com/latest-news/make-a-special-oreo-biscuits-modak-for-ganapati-nrrd-320770.html”]