उत्तर प्रदेशमधून मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्ह्यात शनिवारी सकाळी शनिवारी एक भीषण अपघात झाला आहे. भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात पडली (Uttar Pradesh Accident) या अपघातात सात मुल आणि महिलांसह 20 जणांंचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
[read_also content=”आसाम सरकारचा मोठा निर्णय, मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा रद्द, मुख्यमंत्री म्हणाले – यामुळे बालविवाह थांबेल https://www.navarashtra.com/india/assam-government-repeals-muslim-marriage-and-divorce-registration-act-cm-said-prohibit-child-marriage-nrps-509929.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कासगंजमधील काही भाविक गंगास्नान करण्यासाठी निघाले होते. ट्रॅालीमध्ये 15 ते 20 लोकं बसली होती. दरम्यान, पटियाली दरियावगंज रस्त्यावर ट्रॅाली येताच ती अनियंत्रित होऊन तलावात पडली. यावेळी ट्रॉलीमध्ये प्रवास करणाऱ्या सात मुले आणि आठ महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ आणि आरडाओरडा झाला.
अपघात होता तात्काळ आसपासच्या गावतील लोकांनी आणि पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रॅालीतून अनेक लोकांना काढुन पतियाळी येथील आरोग्य केंद्रात पाठवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आतापर्यंत 15 भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हे भाविक एटा जिल्ह्यातील काहा गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
कासगंज जिल्ह्यातील रस्ते अपघाताची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली. मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50 हजार रुपये देण्याची सूचना मुख्यमंत्री योगी यांनी केली आहे. सर्व जखमींवर योग्य ते मोफत उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यासोबतच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले.