
Bihar Election 2025,
तेजस्वी यांच्या या निर्णयामुळे नितीश कुमार यांना धक्का बसेल का? या प्रश्नाचे उत्तर सध्या देणे कठीण आहे, परंतु महिलांनी बिहारच्या राजकारणात सातत्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. बिहारमध्ये महिलांचा मतदानातील सहभाग वर्षानुवर्षे वाढतच राहिला आहे. अशा परिस्थितीत, महिलांना उमेदवारांचे कमी प्रतिनिधित्व देणे, मुख्यमंत्री नितीश कुमार यांना महागात पडू शकते, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
राष्ट्रीय जनता दलाने (राजद) बिहार विधानसभा निवडणुकीत चाली खेळल्या आहेत. राजदने १४३ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या १४३ जागांवर, राजदने समाजाच्या सर्व घटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वी होताना दिसत आहे. तेजस्वी यादव यांनी २४ महिला उमेदवारांना तिकिटे दिली आहेत. पण त्याचवेळी बिहारमध्ये इतर कोणत्याही पक्षाने इतक्या महिला उमेदवारांना उमेदवारी दिली नाही. भाजप आणि जेडीयू, महायुतीतून निवडणुका लढत आहेत. भाजप आणि जेडीयूने प्रत्येकी १३ महिलांना तिकीट दिले आहे. राजदने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये फक्त २०% पेक्षा कमी महिला आहेत. विरोधी महाआघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने त्यांच्या ६० जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी फक्त पाच महिला उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. याचा अर्थ, काँग्रेसने १०% पेक्षा कमी महिला उमेदवारांना संधी दिली आहे.
राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारांचे सामाजिक समीकरण
सर्वाधिक उमेदवार, ५२ यादव जातीचे आहेत. १८ मुस्लिम आहेत. १३ कुशवाहा आणि २ कुर्मी आहेत. १६ उच्च जातीचे उमेदवार आहेत, ज्यात ७ राजपूत, ६ भूमिहार आणि ३ ब्राह्मण आहेत. वीस उमेदवार अनुसूचित जातीचे आहेत, ज्यात अनुसूचित जमातीचा एक आहे. कोएरी, कुर्मी आणि कुशवाहा व्यतिरिक्त, मागास आणि अत्यंत मागास जातीचे २१ उमेदवार आहेत. यामध्ये चंद्रवंशी (कहार), नोनिया, तेली आणि मल्लाह सारख्या जातींना जास्त प्रतिनिधित्व मिळाले आहे.
लोकप्रिय ‘नटरंग’ नंतर तब्बल पंधरा वर्षांनी नवा तमाशापट, रवी जाधव यांचा ‘फुलवरा’ प्रेक्षकांच्या भेटीस
मुख्यमंत्री नितीश कुमार सुरुवातीपासूनच महिला मतदारांना प्राधान्य देऊन अनेक योजना राबवत आले आहेत. यात महिला विद्यार्थ्यांना सायकली वाटणे यासारख्या योजनांचा समावेश आहे, ज्याचा महिलांना फायदा झाला आहे. महिलांना नितीश कुमार यांचे विश्वासार्ह मतदार मानले जातात. यावेळी महिला उमेदवारांना अपेक्षेइतके महत्त्व देण्यात आलेले नाही. बिहारमध्ये सत्ताधारी जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भाजप प्रत्येकी १०१ विधानसभा जागांवर निवडणूक लढवत असून, प्रत्येकी फक्त १३ महिलांना तिकीट दिले गेले आहे. एनडीएममध्ये तिसरा सर्वात मोठा पक्ष लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) २९ विधानसभा जागांवर लढवत असून, त्यांनी फक्त सहा महिला उमेदवारांना संधी दिली आहे. या आकडेवारीतून बिहार निवडणुकीत महिला प्रतिनिधित्व अजूनही मर्यादित असल्याचे दिसून येते.