Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. नोव्हेंबर महिन्यात बिहार विधानसभा निवडणुका होणार असून ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. ४० वर्षांत पहिल्यांदाच बिहारमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बिहार विधानसभांची घोषणा केली. यात पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांसाठी मतदान होणार आहे. १४ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जातील.
निवडणुकांची घोषणा केल्यानंतर आता आचारसंहिता लागू झाल्यापासून मतदानाच्या पहिल्या टप्प्यापर्यंत बरोबर एक महिन्याचा कालावधी आहे. गेल्या तीन निवडणुकांचा ट्रेंड पाहता, मगध आणि शहाबाद याठिकाणी सर्वात आधी मतदान केले जात होते. म्हणजेच दक्षिण बिहारमधील बहुतेक जागांचा पहिल्या टप्प्यात समावेश असायचा. पण यावेळी मात्र पहिल्या टप्प्यात उत्तर बिहारमधील तिरहुत, मिथिला आणि कोसी प्रदेशातील जागांचा समावेश करण्यात आला आहे.
NDA मजबूत असलेल्या जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात दरभंगा, गोपाळगंज, मुंगेर, खगरिया, मधेपुरा, सहरसा आणि नालंदा येथे मतदान होणार आहे. माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या या जागांवर एनडीएचे आमदार बऱ्यापैकी मजबूत आहेत.
दरभंगा येथील १० पैकी ९ जागांवर, नालंदा येथील ७ पैकी ६, समस्तीपूर येथील १० पैकी ५, शेखपुरा येथील २ पैकी १, मुंगेर येथील ३ पैकी २, खगरिया येथील ४ पैकी २, मधेपुरा येथील ४ पैकी २ आणि सहरसा येथील ४ पैकी ३ जागांवर एनडीएचे आमदार आहेत. पहिल्या टप्प्यातील १२१ जागांपैकी ७० जागांवर तिरहुत आणि मिथिला प्रदेशातील आहेत. यापैकी ३९ जागा एनडीएकडे असून या सर्व जागांवर एनडीए मबजूत आहे. ‘
दुसऱ्या टप्प्यात मगध, अंग प्रदेश आणि शाहाबाद या जिल्ह्यांमध्ये मतदान होईल. अंग प्रदेशातील मुंगेर, शाहाबादमधील बक्सर, कोसीमधील सहरसा, मगधमधील नालंदा आणि शेखपुरा येथे पहिल्या टप्प्यात मतदान होईल. येथे एनडीएची स्थिती चांगली आहे.
तिरहुतमध्येही एनडीएचे वर्चस्व
तिरहुतमध्येही भाजपचे वर्चस्व आहे, जिथे एकूण ६४ विधानसभा जागा आहेत. त्यापैकी ३६ जागा एनडीएकडे आणि २८ जागा महाआघाडीकडे आहेत. मिथिलामधील ४६ जागांपैकी ३० जागा एनडीएकडे आणि १५ जागा महाआघाडीकडे आहेत. २०२० च्या विधानसभा निवडणुकीच्या आधारे, पहिल्या टप्प्यातील १२१ जागांपैकी एनडीएकडे ५९ आणि महाआघाडीकडे ६१ जागा आहेत. दुसऱ्या टप्प्यातील १२२ जागांपैकी एनडीएकडे ६६ आणि ४९ जागा आहेत.
एका ज्येष्ठ पत्रकाराच्या हवाल्याने एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी महाआघाडीचे गड दोन भागात विभागले गेले आहेत. दुसऱ्या टप्प्यात मगध आणि शाहाबादमधील अरवल, औरंगाबाद, गया, जहानाबाद आणि नवादा, कैमूर आणि रोहतास येथे मतदान होईल. पहिल्या टप्प्यात बक्सर, भोजपूर, नालंदा आणि पटना येथे मतदान होईल. सारण आणि तिरहुतमध्येही असेच झाले आहे.
Web Title: Bihar assembly election 2025 voting in the first phase in seats where nda is strong