
Bihar Result Today, Assembly Result
14 Nov 2025 10:33 AM (IST)
१. पोलस्ट्रॅटनुसार, एनडीएला १३३-१४८ जागा मिळण्याची अपेक्षा आहे. भाजपला ६८-७२ जागा, जेडीयूला ५५-६०, एलजेपी-आर ९-१२, एचएएम १-२ आणि आरएलएम ०-२ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
२. पीपल्स पल्सने एनडीएला १३३-१५९ जागा, महाआघाडीला ७५-१०१, प्रशांत किशोर यांच्या जनसूराज ०-५ आणि इतर उमेदवारांना २-८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
३. आयएएनएस-मॅट्रिझ (एबीपी न्यूज) नुसार, एनडीएला १४७-१६७ जागा मिळण्याची अपेक्षा आहे. भाजपला ६५-७३ जागा, जेडीयूला ६७-७५, एलजेपी-आर ७-९, एचएएम ४-५ आणि आरएलएम १-२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याच वेळी, महाआघाडीला ७०-८९ जागा मिळण्याची अपेक्षा होती, ज्यामध्ये राजद ५३-५८, काँग्रेस १०-१२, व्हीआयपी १-४ आणि डाव्या पक्षांना ९-१४ जागांवर आघाडी राखता येईल.
14 Nov 2025 10:25 AM (IST)
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसची स्थिती अत्यंत कमजोर दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार भाजप ४४, जेडीयू ४३, आरजेडी २४, लोजपा १२, तर काँग्रेस फक्त ६ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, बिहार भाजपचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल म्हणाले की, “बिहारचा मुख्यमंत्री संवैधानिक प्रक्रियेद्वारे ठरवला जाईल.”
14 Nov 2025 10:20 AM (IST)
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, पक्षाने ही निवडणूक पूर्णपणे मुद्द्यांवर लढली आहे. त्या म्हणाल्या, “बिहारच्या मतदारांनी कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य द्यायचे ते स्वतः ठरवले. त्यांनी नितीश कुमारांवर विश्वास दाखवला आहे. मला वाटते की पुढील काही वेळात निकालांमध्ये बदल दिसू शकतो, त्यामुळे आत्ताच अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.”
एसआयआर प्रकरणावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की या मुद्द्याचा काँग्रेसला कोणताही प्रतिकूल परिणाम झालेला नाही.एसआयआरच्या मुद्द्याचा उलट परिणाम झाला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह अनेक जण या प्रकरणात अडचणीत सापडले. एका व्यक्तीचा वापर करून अनेक मते निर्माण करण्यात आली. एका निवडणुकीचा निकाल पाहून कोणताही मुद्दा यशस्वी झाला की नाही हे ठरवता येत नाही.”
14 Nov 2025 10:10 AM (IST)
शुक्रवारी सकाळी बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होताच, प्राथमिक ट्रेंड्समध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आघाडी घेत असल्याचे दिसून आले. विविध टीव्ही चॅनेल्सनुसार, भारतीय जनता पक्ष (भाजप)-जनता दल युनायटेड (जेडीयू) युती राज्यातील २४३ जागांपैकी अनेक जागांवर आघाडीवर आहे. सध्याच्या ट्रेंड्सनुसार, एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाने अद्याप कोणतेही अधिकृत ट्रेंड जाहीर केलेले नाहीत.
14 Nov 2025 10:08 AM (IST)
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सिवान मतदारसंघात भाजपचे उमेदवार मंगल पांडे यांनी दुसऱ्या फेरीअखेर 1,071 मतांची आघाडी राखली आहे. पांडे यांना 7,832 मते मिळाली असून आरजेडीचे अवध बिहारी चौधरी यांना 6,761 मते मिळाली आहेत.
बेतिया: रेणू देवींची आघाडी कायम
बेतिया मतदारसंघात भाजपच्या रेणू देवी या 2,000 मतांच्या आघाडीवर आहेत. काँग्रेसचे वासी अहमद दुसऱ्या क्रमांकावर तर रोहित शिकारिया तिसऱ्या स्थानावर आहेत.
14 Nov 2025 10:07 AM (IST)
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत अनपेक्षित घडामोडी दिसत आहेत. उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा लखीसरायमध्ये पिछाडीवर असून जनसुराजचे सूरज कुमार आघाडीवर आहेत. दानापूरमध्ये भाजपाचे राम कृपाल यादव पिछाडीवर आहेत. कल्हगावमध्ये काँग्रेसचे प्रवीण कुमार पिछाडीवर, तर जेडीयूचे शुभानंद मुकेश आघाडीवर आहेत. एचएएमच्या दीपा कुमारी इमामगंजमध्ये पिछाडीवर, तर आरजेडीचे शाहनवाज जोखीहाटमध्ये पिछाडीवर असल्याचे ट्रेंड्समध्ये दिसत आहे.
14 Nov 2025 09:55 AM (IST)
bihar election result date 2025: सकाळी ९:४५ पर्यंत निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार,
जेडीयू- ३९
भाजप- ३६
राजद- २३
लोजपा(आर)- १०
काँग्रेस- ६
हाम- २
व्हीआयपी- १
एआयएमआयएम- १
सीपीआय(एम)- १
सीपीआय(एमएल)- १
टीपीएलआरएसपी- १
14 Nov 2025 09:10 AM (IST)
नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले आहे. यानंतर आज या निवडणूकीचा निकाल जाहिर केला जाणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत मजमोजणीच्या निकालावरून बिहारमध्ये कोणाची सत्ता असेल याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. बिहार निवडणुकीचा परिणाम आता शेअर बाजारावर देखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, आज बिहार निवडणुकीच्या निकालांपूर्वीही भारतीय शेअर बाजार अस्थिर राहण्याची शक्यता आहे. याशिवाय जागतिक बाजारपेठेत झालेल्या मोठ्या घसरणीमुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजार नाकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
14 Nov 2025 09:05 AM (IST)
बिहार विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, एनडीए १०३ जागांवर आघाडीवर आहे. म्हणजेच सत्ताधारी पक्षाने शतकाचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, महाआघाडी ७८ जागांवर पुढे आहे आणि इतर अजूनही ६ जागांवर आघाडीवर आहेत.
14 Nov 2025 09:00 AM (IST)
बिहार काँग्रेस अध्यक्ष राजेश राम कुटुंबा मतदारसंघात आघाडीवर आहेत, तर लालगंज मतदारसंघात शिवानी शुक्ला आघाडीवर आहेत.
14 Nov 2025 08:52 AM (IST)
तरनतारनमध्ये मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष आम आदमी पक्षाचे भवितव्य पणाला लागले आहे. निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने (आप) प्रचारात आपली सर्व ताकद पणाला लावली होती. निवडणूक निकालांमध्ये कोणाला पराभव पत्करावा लागतो हे पाहणे बाकी आहे.
14 Nov 2025 08:41 AM (IST)
बिहार सरकारचे जमीन आणि महसूल मंत्री संजय सरावगी यांनी मतमोजणी केंद्रावर जाण्यापूर्वी त्यांच्या पत्नीसह श्यामा माई मंदिरात भेट देऊन प्रार्थना केली. त्यांनी श्यामा देवीचे दर्शन घेत निवडणुकीत सलग सहाव्यांदा विजय मिळवण्यासाठी आशीर्वाद मागितले.
14 Nov 2025 08:33 AM (IST)
बिहार विधानसभा निवडणुकीतील 243 जागांसाठी मतदान झाले. या मतदानानंतर लगेचच एक्झिट पोलचे कल समोर आले. मॅट्रिज आयएएनएसच्या एक्झिट पोलनुसार, राज्यात एनडीए पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. एनडीएला 147 ते 167 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. महाआघाडीला 70 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
14 Nov 2025 08:25 AM (IST)
दोन्ही टप्प्यातील मतदान पार पडताच एक्झिट पोल समोर येत आहेत. त्यानुसार, भाजपप्रणित एनडीएला दीडशेहून जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीएला 145 ते 163 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महागठबंधनला 76 ते 95 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
14 Nov 2025 08:12 AM (IST)
राज्यात एकूण 243 विधानसभा जागा आहेत. बिहारमध्ये सरकार स्थापनेसाठी 122 आमदारांची गरज भासणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी संपले. 20 जिल्ह्यांमधील 122 जागांवर मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 68.42 टक्के मतदान झाले.
14 Nov 2025 08:03 AM (IST)
एनडीएला 2020 मध्ये 132 जागा मिळाल्या होत्या. तर, महागठबंधन बहुमतापासून दूर राहिलं होतं. राजदला 75 जागा, काँग्रेसला 19 आणि सीपीआये माले पक्षाला 12 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, आता या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.
14 Nov 2025 07:54 AM (IST)
बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 मतदारसंघात 65.08 टक्के मतदान पार पडलं आहे. गेल्यावेळी पहिल्या टप्प्यात 57.29 टक्के मतदान झालं. तर, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात 20 जिल्ह्यातील 122 जागांवर 68.76 टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एकूण 66.91 टक्के मतदान झालं आहे.
14 Nov 2025 07:43 AM (IST)
सर्व गरीब लोकांचे, सर्व कामगारांचे, कामगार वर्गाचे, कमी उत्पन्न गटांचे आणि आंबेडकरांच्या विचारसरणीचे पालन करणाऱ्या सर्वांचं सरकार येत आहे. सकाळी अकरापर्यंत तुम्हाला महागठबंधन सरकार स्थापन करताना दिसेल, असे विकासशील इन्सान पक्षाचे प्रवक्ते देव ज्योती यांनी म्हटले आहे.
14 Nov 2025 07:34 AM (IST)
ईव्हीएम आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांचा वापर ज्या पद्धतीनं केला जातो, त्याच पद्धतीनं निकाल येतात ते निरर्थक आहे. हे फार काळ टिकणार नाही. कारण देशातील जनतेला त्यांची फसवणूक होत असल्याचं समजलं आहे. निवडणूक आयोग त्यांच्यावर सर्वात मोठा आघात करत आहे, तो म्हणजे त्यांना मतदानाचा संवैधानिक अधिकार हिरावून घेतला जात आहे.
14 Nov 2025 07:24 AM (IST)
बिहारमधील जनतेने मोठ्या संख्येनं मतदान केले. त्यामुळे या निवडणुकीत चांगली रंगत येणार आहे. त्यातच एनडीए सर्व जागांवर आघाडी घेईल आणि बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होईल, असे मंत्री प्रेम कुमार यांनी म्हटले आहे.
14 Nov 2025 07:19 AM (IST)
बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. 'मतमोजणी जर निष्पक्ष झाली तर आपण सरकार स्थापन करू. अखिल भारतीय आघाडीच्या सदस्यांनी चांगले लढा दिला. आज या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल', असे राजेश राम यांनी म्हटले आहे.
14 Nov 2025 07:13 AM (IST)
"लोकशाहीच्या महान उत्सवाचा आज सर्वात ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस आहे. आजचे निकाल केवळ बिहारसाठीच नाही तर देशासाठी शुभ असतील. बिहार एक उदाहरण निर्माण करेल. जनताच मालक आहे, जनताच निर्णय घेईल. बिहारचे लोक या घराणेशाही लोकांचा...जंगलराजचे राजपुत्र, त्यांची जमीनदारी कधीही स्वीकारणार नाहीत'', असे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी म्हटले आहे.
Bihar Election Result 2025 Today live नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले. त्यानंतर आता या निवडणुकीचे निकाल आज जाहीर केले जाणार आहे. मतमोजणीला सकाळी आठपासून सुरुवात होणार असून, हळूहळू या निवडणुकीचे चित्र समोर येणार आहे. दुपारपर्यंत बिहारमध्ये कोण विजयी ? हे स्पष्ट होईल.
बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान घेण्यात आले. या निकालाला राजकीय घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट म्हटले जात आहे. म्हणूनच इतर पक्षांबरोबरच भाजपाचेही या निवडणूक निकालांकडे डोळे लागले आहेत. ही निवडणूक भाजपासाठी महत्त्वाची आहे कारण ती बिहारमध्ये एनडीएमध्ये मोठा भाऊ कोण असेल? हे ठरवेल, भाजपा ही जागा जिंकेल का की जेडीयू पुन्हा एकदा ताकद मिळवून पूर्वीचे स्थान परत मिळवेल ? काही सर्वेक्षणांनी भाकित केले आहे की भाजपा तिसरा सर्वांत मोठा पक्ष बनेल आणि आरजेडी पहिला सर्वात मोठा पक्ष बनेल. ज्यामुळे देशात उत्सुकता निर्माण झाली आहे.
या निवडणुकीमुळे चिराग पासवान यांच्या पक्षाची कामगिरी सिद्ध होईल, ज्यांनी लोकसभा निवडणुकीत पाचही जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा १००% स्ट्राइक रेट होता असा त्यांचा सातत्याने दावा आहे. यामुळे ते अप्रत्यक्षपणे स्वतःला बिहारचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहात आहेत.