Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हिजाब’ वाद नडला! मुख्यमंत्री Nitish Kumar यांना जीवे मारण्याची धमकी; बिहारमध्ये ‘हाय अलर्ट’ आणि सुरक्षा कडक

Nitish Kumar Security: हिजाब प्रकरणानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर त्यांची सुरक्षा कडक करण्यात आली असून बिहार पोलीस हाय अलर्टवर आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 18, 2025 | 08:00 PM
'हिजाब' वाद नडला! मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी (Photo Credi t- X)

'हिजाब' वाद नडला! मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी (Photo Credi t- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मुख्यमंत्री नितीश कुमार कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर?
  • सुरक्षेत अचानक मोठी वाढ
  • संशयितांवर पोलिसांची नजर
Nitish Kumar Hijab Controversy: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांच्या सुरक्षेत अचानक मोठी वाढ करण्यात आली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात मुस्लिम महिलेच्या चेहऱ्यावरून ‘हिजाब’ काढल्याच्या वादग्रस्त प्रकरणावरून त्यांना सोशल मीडियाद्वारे धमक्या मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर बिहार पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आले आहे.

सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल

नितीश कुमार यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोलीस महासंचालक (DGP) आणि अतिरिक्त महासंचालक (SSG) यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आले. विशेष सुरक्षा गटाला मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणासाठी अधिक सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. आता केवळ निवडक आणि उच्च-प्रोफाइल व्यक्तींनाच मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाण्याची परवानगी असेल. राज्यातील सर्व एसएसपी (SSP) आणि पोलीस अधीक्षकांना (SP) आपापल्या भागात विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

The Bihar government has significantly intensified the security cover for Chief Minister Nitish Kumar following the widespread political uproar surrounding the recent hijab incident. Citing potential threats and the volatile atmosphere created by polarized reactions, intelligence… pic.twitter.com/aW2G2Fgx57 — The Daily Guardian (@DailyGuardian1) December 18, 2025


सोशल मीडियावरून धमक्या आणि गुप्तचर अहवाल

गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, हिजाब प्रकरणानंतर काही कट्टरपंथी आणि समाजकंटक घटकांमध्ये मोठा संताप आहे. सोशल मीडियावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, सार्वजनिक कार्यक्रम आणि त्यांच्या प्रवासादरम्यानचा सुरक्षा ताफा अधिक मजबूत करण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Nitish Kumar Hijab Controversy: ‘नितीश कुमारांनी बिनशर्त माफी मागावी…’, हिजाब प्रकरणानंतर ‘दंगल गर्ल’ झायरा वसीम संतापली

नेमके प्रकरण काय आहे?

सोशल मीडियावर नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यावरून हा सर्व वाद निर्माण झाला. एका सरकारी कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार मुस्लिम महिला डॉक्टरांना नियुक्ती पत्र देत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अचानक त्या महिला डॉक्टरच्या चेहऱ्यावरून हिजाब काढला. मंचावर उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती. या कृतीमुळे मुस्लिम समुदायातून आणि विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, याच रागातून मुख्यमंत्र्यांना धमक्या मिळत असल्याचे बोलले जात आहे.

‘हा अपमान आहे, बिनशर्त माफी मागा!’ – झायरा वसीम

बॉलिवूड फेम ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमने अतिशय संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या झायराने (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आणि नितीश कुमार यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली. एका महिलेची प्रतिष्ठा आणि शिष्टाचार हे खेळण्यासारखे खेळणे नाही, विशेषतः सार्वजनिक व्यासपीठावर नाही. एक मुस्लिम महिला म्हणून, दुसऱ्या महिलेचा बुरखा इतक्या सहजपणे खाली ओढलेला पाहणे अत्यंत अपमानजनक होते, त्यासोबत ते बेफिकीर हास्य होते. सत्ता म्हणजे सीमा ओलांडणे असे नाही. नितीश कुमार यांनी त्या महिलेची बिनशर्त माफी मागावी.

हे देखील वाचा: Bihar oath taking ceremony : आमदारांना वाचताही येईना! नितीश कुमारांच्या महिला नेत्याची शपथ घेताना सभागृहात उडाली धांदल

Web Title: Bihar chief minister nitish kumar receives death threat over the hijab controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • bihar
  • CM Nitish Kumar
  • hijab controversy

संबंधित बातम्या

Nitish Kumar Hijab Controversy: ‘नितीश कुमारांनी बिनशर्त माफी मागावी…’, हिजाब प्रकरणानंतर ‘दंगल गर्ल’ झायरा वसीम संतापली
1

Nitish Kumar Hijab Controversy: ‘नितीश कुमारांनी बिनशर्त माफी मागावी…’, हिजाब प्रकरणानंतर ‘दंगल गर्ल’ झायरा वसीम संतापली

Video: नितीश कुमार वादाच्या भोवऱ्यात! सार्वजनिक कार्यक्रमात महिलेचा हिजाब काढला, विरोधक संतापले
2

Video: नितीश कुमार वादाच्या भोवऱ्यात! सार्वजनिक कार्यक्रमात महिलेचा हिजाब काढला, विरोधक संतापले

BJP Politics: भाजपने खेळला मोठा डाव! ‘या’ नेत्यावर सोपवली अध्यक्षपदाची जबाबदारी
3

BJP Politics: भाजपने खेळला मोठा डाव! ‘या’ नेत्यावर सोपवली अध्यक्षपदाची जबाबदारी

भाजपची मोठी खेळी! राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून बिहारचे मंत्री नितीन नबीन यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहे ते..
4

भाजपची मोठी खेळी! राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून बिहारचे मंत्री नितीन नबीन यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहे ते..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.