बिहार निवडणुकीआधी 'NDA' मध्ये बिघाड? दिल्लीत CM च्या शपथविधी सोहळ्याला नितीश कुमार राहणार गैरहजर? पहा अंदर की बात...
नवी दिल्ली: नुकतीच दिल्ली विधानसभेची निवडणुक पार पडली. या निवडणुकीत भाजपने जोरदार यश प्राप्त केले. 70 पैकी 48 जागा जिंकल्या. लवकरच नवीन मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. 20 फेब्रुवारी म्हणजेच गुरुवारी दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. दरम्यान 27 वर्षांनी दिल्लीत भाजपची सत्ता आल्याने भाजप शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात करणार यात कोणतीही शंका नाही. यासाठी देशातील सर्व एनडीएच्या मुख्यमंत्र्याना आमंत्रण देखील देण्यात आले आहे. दरम्यान याच दरम्यान बिहारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे समजते आहे.
20 फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. या सोहळ्याला एनडीएच्या सर्व मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे या सोहळ्यास उपस्थित राहणार नाहीत, असे म्हटले जात आहे. त्यामुळे एनडीएमध्ये अजूनही नितीश कुमार नाराज आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
नितीश कुमार यांचा स्वीकार, नकार यामुळे ते कायमच चर्चेत राहिले आहेत. नितीश कुमार यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार दिल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. बिहारमध्ये सध्या नितीश कुमार प्रगती यात्रेत व्यस्त असल्याचे समजत आहे. प्रगती यात्रेचे कारण देऊन त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण शक्य नसल्याचे सांगितले असल्याचे म्हटले जात आहे.
नितीश कुमार नाराज?
दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला नितीश कुमार उपस्थित राहणार नाहीत असे म्हटले जात आहे. यामागे त्यांनी प्रगती यात्रेचे कारण दिले आहे. मात्र राजकीय विश्लेषक अन्य कारणामुळे ते उपस्थित राहणार नसल्याचे म्हणत असल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या बुरारी मतदारसंघात जेडीयूचा उमेदवार पराभूत झाल्याने नितीश कुमार नाराज असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात भाजप नेत्यांनी युती धर्माचे पालन केले नसल्याचे त्यांचे मत आहे. भाजपने जेडीयू उमेदवारांचा प्रचार न केल्याने तिथे पराभव स्वीकारावा लागला असे नितीश कुमार यांना वाटत आहे अशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान नितीह कुमार हे उपस्थित राहणार नसल्याने अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे नितीश कुमार दिल्लीच्या भाजपच्या मुख्यमंत्ऱ्यांच्या शपथविधीला का येणार नाहीत याचे कारण नितीश कुमार सांगतील तेव्हाच स्पष्ट होणार आहे. दरम्यान 20 फेब्रुवारी रोजी दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत.
दिल्लीला २० फेब्रुवारीला मिळणार नवा मुख्यमंत्री, हे आहेत CM पदाचे दावेदार?
दिल्लीत सरकार स्थापनेची तयारी जोरात सुरू आहे. भारतीय जनता पक्ष १९ फेब्रुवारी रोजी दिल्लीत सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. यानंतर नवीन मुख्यमंत्री २० फेब्रुवारी रोजी शपथ घेतील. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक १९ फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणार आहे. नवीन सरकार स्थापनेपूर्वी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. .या बैठकीत आमदार आपला नेता निवडतील. यानंतर मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केले जाईल. मात्र अद्याप कोणतेही नाव जाहीर केलेले नाही. भाजप मुख्यमंत्रीपदासाठी नवीन चेहऱ्यांची घोषणा करण्यासाठी ओळखला जातो. मुख्यमंत्रीपदासाठी काही प्रमुख नावांची चर्चा सुरू आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण कोण आहेत शर्यतीत?