Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकीय हालचालींना वेग, पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादी ‘किंगमेकर’; सत्ता स्थापनेसाठी…

पुरंदर पंचायत समितीत सत्ता स्थापन करण्यासाठी किमान पाच सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असल्याने राष्ट्रवादीला बहुमतासाठी आणखी एका सदस्याची गरज भासणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 23, 2026 | 06:05 PM
राजकीय हालचालींना वेग, पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादी ‘किंगमेकर’; सत्ता स्थापनेसाठी...

राजकीय हालचालींना वेग, पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादी ‘किंगमेकर’; सत्ता स्थापनेसाठी...

Follow Us
Follow Us:
  • राजकीय हालचालींना वेग
  • पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादी ‘किंगमेकर’
  • सत्ता स्थापनेसाठी बैठका सुरु
पुणे : पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर पुरंदर तालुक्यातील सत्तासमीकरणांवर चर्चा रंगू लागली आहे. एकूण आठ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने चार जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे. तर शिवसेनाला दोन आणि भारतीय जनता पार्टीला दोन जागा मिळाल्या आहेत. पंचायत समितीत सत्ता स्थापन करण्यासाठी किमान पाच सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असल्याने राष्ट्रवादीला बहुमतासाठी आणखी एका सदस्याची गरज भासणार आहे. यामुळे राष्ट्रवादीसमोर शिवसेना किंवा भाजप या दोन पर्यायांपैकी एकाशी युती करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही पक्ष महायुतीतील घटक असल्याने राष्ट्रवादी नेमकी कोणाबरोबर हातमिळवणी करणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. निकाल जाहीर झाल्यापासून राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुकांकडून पडद्यामागील संपर्क आणि बैठका सुरू झाल्याची चर्चा आहे.

 

दरम्यान, राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेबरोबर युती करण्याची मागणी अधिक जोर धरताना दिसत आहे. तालुक्यातील स्थानिक राजकीय समीकरणे, व्यक्तीगत संबंध आणि आगामी निवडणुकांचे गणित लक्षात घेता शिवसेनेशी आघाडी केल्यास स्थिर सत्ता निर्माण होईल, असा कार्यकर्त्यांचा दावा आहे. त्यामुळे पुरंदरमध्ये राष्ट्रवादी-शिवसेना समीकरण आकार घेण्याची शक्यता अधिक असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा : आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

पाठिंब्याशिवाय अंतिम निर्णय कठीण

पुरंदरमध्ये शिवसेनेचे आमदार म्हणून विजय शिवतारे यांचे प्रभावी अस्तित्व आहे. तर भाजपकडून माजी आमदार संजय जगताप यांच्याकडे स्थानिक नेतृत्वाची धुरा आहे. या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेकडेही सध्या लक्ष लागले आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय स्थानिक पातळीवरील अंतिम निर्णय होणे कठीण मानले जात आहे. अर्थात, पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडीच्या वेळीच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या पक्षासोबत युती करत सत्ता स्थापनेचा मार्ग स्वीकारते, यावर पुरंदर तालुक्यातील पुढील अडीच वर्षांचे राजकारण अवलंबून राहणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत तालुक्यातील राजकीय हालचाली अधिकच वेग घेण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीला तिलांजली, बेफिकीर अन् टपोरीपणासारखे…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

Web Title: Ncp has won more seats in purandar panchayat samiti elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • BJP
  • Purandar News

संबंधित बातम्या

‘फॅसिस्ट विचार देशासाठी घातक, संविधान वाचवण्यासाठी पुढे या,’ हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका
1

‘फॅसिस्ट विचार देशासाठी घातक, संविधान वाचवण्यासाठी पुढे या,’ हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
2

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
3

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल
4

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.