Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमालेंची बिनवरोध निवड; राष्ट्रवादीचा अर्ज बाद

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले यांची निवड झाली आहे. भिमाले हे बिनविराेध निवडून आले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 24, 2026 | 11:38 AM
स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमालेंची बिनवरोध निवड; राष्ट्रवादीचा अर्ज बाद

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमालेंची बिनवरोध निवड; राष्ट्रवादीचा अर्ज बाद

Follow Us
Follow Us:
  • स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले
  • बिनवरोध झाली निवड
  • राष्ट्रवादीचा अर्ज बाद
पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले यांची निवड झाली आहे. एकहाती सत्ता असल्याने भिमाले यांच्या विजयाची औपचारीकता बाकी हाेती. साेमवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक सुहास टिंगरे यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे भिमाले हे बिनविराेध निवडून आले आहेत.

 

स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून सुहास टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अध्यक्ष पदासाठी सोमवारी (२३ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता निवडणूक घेतली. निवडणूक निर्णय अधिकारी व एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके यांनी अर्जांची छाननी केली. यामध्ये टिंगरे यांनी वेळ संपल्यानंतर एक मिनीटाने उशीरा अर्ज दाखल केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचा अर्ज बाद केला.

यावर राष्ट्रवादीच्या वैशाली बनकर यांनी अक्षेप घेतला. आम्ही वेळेत अर्ज दाखल केला होता, मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुकीची वेळ टाकल्याचा आरोप केला. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळत भिमाले यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, नगरसचिव योगिता भोसले यांच्यासह स्थायी समिती सदस्य उपस्थित होते. दरम्यान, निवड झाल्यानंतर महापौर मंजुषा नागपूरे, सभागृहनेते गणेश बिडकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी भिमाले यांचे अभिनंदन केले.

भिमाले यांच्यासमोर मोठी जबाबदारी

महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी ११९ नगरसेवक निवडून देत भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. चार वर्षाच्या प्रशासक राज नंतर लोकनियुक्त महापौर आणि उपमहापौरही निवडण्यात आले आहेत. आता स्थायी समितीचे अध्यक्षही निवडले गेले आहेत. स्थायी समिती ही महापालिकेतील सर्वाधिक महत्त्वाची समिती मानली जाते. महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांवर, खर्चाच्या मंजुरीवर आणि विविध विकासकामांच्या प्रस्तावांवर अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार या समितीकडे असतात. त्यामुळे अध्यक्षपदाला विशेष महत्त्व आहे. आगामी अर्थसंकल्प, प्रलंबित प्रकल्प आणि विकासकामांच्या पार्श्वभूमीवर भिमाले यांच्यासमोर मोठी जबाबदारी असणार आहे.

हे सुद्धा वाचा : राजकीय हालचालींना वेग, पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादी ‘किंगमेकर’; सत्ता स्थापनेसाठी…

सभागृहातून वॉकआऊट

स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा अर्ज वेळेतच दाखल केला होता, असे टिंगरे आणि बनकर यांनी सांगितले. मात्र वेळेत अर्ज दाखल केला नसल्यामुळे अर्ज बाद केल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी सांगताच टिंगरे आणि बनकर यांनी सभागृहातून वॉकआऊट केले.

Web Title: Srinath bhimale has been elected unopposed as the chairman of the pune municipal corporations standing committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • BJP
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Pune MLC Election : पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपचा शड्डू! रविंद्र चव्हाण मैदानात
1

Pune MLC Election : पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपचा शड्डू! रविंद्र चव्हाण मैदानात

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका
2

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज
3

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
4

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.