Bjp central government jp nadda accepted mp priyanka-gandhi wayanad government medical college demand
नवी दिल्ली : सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसमध्ये जोरदार राजकीय वादंग पाहायला मिळतो. अनेकदा खासदार राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी या भाजप नेत्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत असतात. राजकीय भाषणांचा मंच असो किंवा संसदीय सभागृह हे नेते एकमेकांवर जोरदार आरोप करताना दिसून येतात. मात्र आता एक आश्चर्य घडलं असून चक्क भाजपने केली कॉंग्रेसची मागणी पूर्ण केली आहे.
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी त्यांच्या वायनाड मतदारसंघासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी केली होती. प्रियंका गांधी वाड्रा यांच्या प्रयत्नांनंतर, त्यांच्या संसदीय मतदारसंघ वायनाडमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न साकार होणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने मनंतवाडी वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता दिली आहे. प्रियांका गांधी यांनी या बातमीवर आनंद व्यक्त केला आणि सांगितले की हे वायनाडच्या लाखो लोकांच्या प्रार्थना आणि राहुल गांधी यांच्या सततच्या प्रयत्नांचे फळ आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या निर्णयापूर्वी प्रियंका गांधी यांनी २१ ऑगस्ट रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी नड्डा यांना वायनाडमधील काही आरोग्य प्रकल्पांना गती देण्याची विनंती केली. मनंतवाडीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय नसल्यामुळे स्थानिक लोकांना येणाऱ्या गंभीर अडचणींबद्दल त्यांनी विशेषतः सांगितले.
प्रियांका गांधींनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट
प्रियांका गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या सर्व मागण्या काळजीपूर्वक ऐकल्या आणि त्यावर मोकळेपणाने चर्चा केली. या बैठकीनंतर, वैद्यकीय महाविद्यालयाला मिळालेली मान्यता ही त्यांच्या प्रयत्नांचे थेट परिणाम मानली जात आहे.
वायनाडच्या लोकांना आणि राज्य सरकारला आवाहन
प्रियंका गांधी वड्रा यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “अखेर वायनाडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण होणार आहे हे जाणून खूप आनंद झाला. वायनाडच्या लाखो लोकांच्या प्रार्थना, राहुल गांधींचे सततचे प्रयत्न आणि हे प्रकरण लवकर मिटवण्यासाठी आमच्या सर्व प्रयत्नांना फळ मिळाले आहे.” त्यांनी सर्व संबंधित पक्षांचे आभार मानले ज्यांनी त्यांची विनंती ऐकली आणि वायनाडच्या नागरिकांसाठी आरोग्यसेवा सुधारण्याच्या दिशेने स्वागतार्ह पाऊल उचलले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
केरळ सरकारला आवाहन
त्यांनी केरळ राज्य सरकारला आवाहन केले की, “मला आशा आहे की राज्य सरकार हे काम जलद करण्यासाठी आणि ते लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल.” ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांच्या विकास आणि प्रगतीच्या समान ध्येयासाठी सर्वांनी एकत्र काम करावे असे त्या म्हणाल्या.
प्रियांका गांधी यांची जेपी नड्डा यांच्याकडे एम्सची मागणी
प्रियंका गांधी यांनी वायनाडमधील सर्व बंधू आणि भगिनींचे या निर्णयाबद्दल अभिनंदन केले, जे या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. त्यांच्या बैठकीत त्यांनी जेपी नड्डा यांच्यासमोर केरळसाठी एम्सची दीर्घकाळापासूनची मागणी पुन्हा मांडली.