Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना खलनायक का ठरवलंय जातंय? हसन मुश्रीफ यांचे विलिनीकरणाबाबत मोठं वक्तव्य

अजित पवार यांच्या अपघाती निधनाची योग्य सखोल चौकशी होणार आहे. त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबत फक्त अजित पवारांना माहिती होते असे हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 13, 2026 | 07:13 PM
Hasan Mushrif reacts to Ajit Pawar's plane crash and two NCP unity Kolhapur News

Hasan Mushrif reacts to Ajit Pawar's plane crash and two NCP unity Kolhapur News

Follow Us
Close
Follow Us:
  • हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूरमध्ये माध्यम संवाद
  • अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या भविष्याबाबत वक्तव्य
  • विमान अपघाताची सखोल चौकशी होणार असल्याची माहितीन
NCP Politics : कोल्हापूर : राज्याचे दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यामुळे राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे. बारामती विमान अपघाताबाबत अनेक नेत्यांनी संशय घेतला आहे. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी दोन वेळा पत्रकार परिषद घेत कारवाईची मागणी केली आहे. याबाबत आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी देखील या अपघाताची पूर्ण सखोल चौकशी केली जाईल असे कोल्हापूरमधील अजित पवारांच्या समर्थकांना आश्वस्त केले आहे.

हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आमदार रोहित पवार यांनी अजितदादा यांच्या विमान अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितले होते की लोकांच्या मनातील शंका दूर झाल्या पाहिजेत. जे आक्षेप घेतले गेले आहेत, त्यांची सखोल चौकशी राज्य शासन करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
अजितदादांच्या अपघातामुळे जसे रोहित पवारांना दुःख झाले आहे, त्यापेक्षा जास्त दुःख आम्हाला झाले आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

हे देखील वाचा : 

पुढे हसन मुश्रीफ म्हणाले की,  “आमच्याही मनामध्ये अपघाताबाबत काही शंका आहेत. त्या आम्ही मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या आहेत. रोहित पवारांनी आमच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींमध्ये कृपया हस्तक्षेप करू नये. अजितदादांच्या अपघाताबद्दल त्यांचा पुतण्या म्हणून रोहित पवारांची अस्वस्थता मी समजू शकतो,”असे देखील ते म्हणाले आहेत.

अजित पवारांनंतर राष्ट्रवादी पक्षाच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर उत्तर देताना हसन मुश्रीफ म्हणाले की, “प्रफुल्ल पटेल हे पवार साहेबांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत आणि आजही ते कार्याध्यक्ष आहेत. सुनेत्रा वहिनी यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतरही प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष म्हणून राहणार आहेत. सुनील तटकरे हे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे आमदारांची बैठक बोलावण्याचा अधिकार त्यांना आहे. मग या दोघांनाच का लक्ष्य केले जाते? त्यांना खलनायक का ठरवले जाते? त्यामुळे विनाकारण त्यांना लक्ष्य करू नका. आमच्या पक्षामध्ये कोणीही लुडबूड करू नये,” असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.

हे देखील वाचा : 

पुढे ते म्हणाले की,” विलीनीकरणाबाबत अजितदादा एकटेच चर्चा करत होते. आमच्यापैकी कोणीही त्या ठिकाणी नव्हते. विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही, असा आमचा दावा नाही. पण अजितदादा गेल्यानंतर परिस्थिती बदललेली आहे. आम्हाला भारतीय जनता पक्षाला विश्वासात घ्यावे लागेल. त्यांचे मत काय आहे, ते पाहावे लागेल. तसेच सुनेत्रा वहिनी आणि कुटुंबीयांचे मत काय आहे, याबाबत पक्षामध्ये चर्चा होईल. विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये मी नव्हतो. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार पवार साहेबांनी थांबायचे आणि अजितदादांनी नेतृत्व करायचे, असे सांगितले जात आहे. शशिकांत शिंदे बोलत असतं. मात्र ती चर्चा जिल्हा परिषद निवडणुकीबाबत असायची. या विलीनीकरणाबाबत अजितदादा आमच्याशी काही बोलले नव्हते, हे खरे आहे,” अशी भूमिका हसन मुश्रीफ यांनी घेतली आहे.

“कोल्हापूरच्या विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारण्याचे ठरले आहे. त्याचा प्रस्ताव संभाजीराजे यांनी अजितदादांकडे त्यावेळी दिला होता. एमआयडीसीची जमीन मैदानासाठी देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला होता. अजितदादा यांनी मांडलेल्या चार ते पाच मुद्द्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. त्यामध्ये कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानास मंजुरी देण्यात आली आहे. या मैदानाला स्वर्गीय अजितदादा यांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला आहे. याबद्दल जिल्हा नियोजन मंडळाचे मी आभार मानतो. आता या नावामध्ये बदल होणार नाही. इतर कोणी मागणी केली असेल, तर त्यांचे नाव इतर प्रकल्पांना देऊ शकतो. अजून भरपूर कामे आहेत. सुनेत्रा वहिनी पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना मनोधैर्य देण्यासाठी प्रयत्न करत आहेत,” असे देखील हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

 

 

Web Title: Hasan mushrif reacts to ajit pawars plane crash and two ncp unity kolhapur news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Hasan Mushrif
  • political news

संबंधित बातम्या

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट
1

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार
2

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
3

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम लवकरच होणार जाहीर; अडीच वर्षांपासून जागा रिक्त
4

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम लवकरच होणार जाहीर; अडीच वर्षांपासून जागा रिक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.