Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP National President News: भाजपच्या नवे राष्ट्रीय अध्यक्ष पदाचं घोड कुठं अडलं? भाजपच्या गोटात नेमकं चाललंय काय?

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षाच्या सूत्रांनुसार, जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी नवीन अध्यक्षाची घोषणा केली जाऊ शकते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 29, 2025 | 02:20 PM
BJP National President News: भाजपच्या नवे राष्ट्रीय अध्यक्ष पदाचं घोड कुठं अडलं? भाजपच्या गोटात नेमकं चाललंय काय?
Follow Us
Close
Follow Us:

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड प्रक्रिया खूपच  लांबणीवर पडल असल्याचे दिसत आहे. रष्ट्रीय अध्यक्षपदाच्या यादीत अनेकांची नावे  समोर आली असली तरी अद्याप कोणतेही एक निश्चित नाव समोर आलेले नाही. सूत्रांनुसार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यात संभाव्य नावांवर एकमत झालेलं नाही. त्यामुळे नव्या अध्यक्षाच्या निवडीचा निर्णय प्रलंबित  असल्याचे बोलले जात आहे.

नवीन अध्यक्षांसमोर निवडणुकांचे आव्हान

या पदावर कोणताही नवा चेहरा आला, तरी त्याला काही गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्षाला २०२५ मधील बिहार विधानसभा निवडणुकांपासून सुरू होणाऱ्या आगामी निवडणुकींचा सामना करावा लागेल. यानंतर २०२६ मध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामसारख्या राज्यांतील विधानसभा निवडणुका त्यांच्यासाठी खरी कसोटी ठरणार आहेत.

भाजपच्या संविधानानुसार, पक्षाचे किमान १९ राज्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडता येतो. आतापर्यंत पक्षाने ३७ पैकी १४ राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली आहे. उर्वरित महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटक या महत्त्वाच्या राज्यांमध्ये  प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्याही प्रलंबित आहेत.

Eknath Shinde Shivsena: शिवसेनेत कुख्यात गुंड युवराज माथनकरचा प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती    

 जुलैमध्ये होऊ शकते घोषणा

भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. यामुळे पुढील काही आठवडे भाजपसाठी संघटनात्मक दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.

भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष कोण ? संभाव्य नावांवर चर्चा

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षाच्या सूत्रांनुसार, जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी नवीन अध्यक्षाची घोषणा केली जाऊ शकते. सध्याचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला असला, तरी आता नव्या नेतृत्वाची गरज निर्माण झाली आहे.

नव्या अध्यक्षपदासाठी खालील काही नावे चर्चेत आहेत:

मनोहर लाल खट्टर : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री. वय ७०-७१ वर्षे असल्याने वयोमर्यादा हा अडथळा ठरू शकतो, तरीही त्यांचे नाव प्रमुख दावेदारांमध्ये गणले जात आहे.

धर्मेंद्र प्रधान : केंद्रीय शिक्षणमंत्री. संघ परिवारात आणि संघटनात मजबूत पकड असल्यामुळे त्यांच्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

भूपेंद्र यादव : केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ रणनीतीकार. संघटनात्मक कौशल्य आणि निवडणूक व्यवस्थापनात निपुण.

निर्मला सीतारमण : केंद्रीय अर्थमंत्री. पक्षाच्या महिला नेतृत्वाला प्राधान्य दिल्यास त्यांचे नाव पुढे येऊ शकते. भाजपच्या इतिहासात महिला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड ऐतिहासिक ठरू शकते.

भयानक दिसणाऱ्या बाहुल्यांनी जगाला घातलीये भुरळ! ‘Labubu Doll’ आवडण्याचे नक्की कारण

निवडणुकीची स्थिती काय?

सध्या ३७ राज्यांपैकी फक्त १४ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित महत्त्वाच्या राज्यांमध्ये
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल — अजूनही प्रदेशाध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू नाही.

महाराष्ट्र: रवींद्र चव्हाण यांचा मार्ग सोपा

महाराष्ट्र: महाराष्ट्रात मार्ग थोडा सोपा दिसतोय. मराठा समाजातून आलेले रवींद्र चव्हाण यांची आधीच कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या त्यांच्या जवळीकतेमुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सोपवणे सोपे होत आहे. भाजपच्या संघटन रचनेनुसार, राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करण्यापूर्वी बहुसंख्य राज्यांमध्ये प्रदेशस्तरीय निवडणुका पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे पक्ष सध्या संघटनात्मक पायाभरणीवर भर देत आहे.

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवड: आधी राज्यांतील गणित, मग राष्ट्रीय नेतृत्व

भारतीय जनता पक्षासाठी (भाजप) राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून ती राज्य पातळीवरील संघटनात्मक समतोलावरही अवलंबून आहे. सध्या अनेक राज्यांत अध्यक्षपदासाठीची स्थिती गुंतागुंतीची आहे. त्यामुळे राष्ट्रीय नेतृत्वासाठी एकमत होणे कठीण ठरण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीसाठी राज्यांत एकमत आवश्यक

सध्या अनेक राज्यांतील नियुक्त्या प्रलंबित असल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षाच्या घोषणेवरही परिणाम होतो आहे. भाजपला अशा चेहऱ्याची गरज आहे, जो केवळ संघटना मजबूत करेल असं नव्हे, तर २०२९ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत पक्षाचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळू शकेल.

Web Title: Bjp national president post remains in suspense decision pending in sangh high command

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • BJP National President
  • national news

संबंधित बातम्या

Rain Update: पाऊस थांबेना! महाराष्ट्रासह १३ राज्यात पावसाचे अलर्ट, अनेक राज्यात कडाडणार वीज
1

Rain Update: पाऊस थांबेना! महाराष्ट्रासह १३ राज्यात पावसाचे अलर्ट, अनेक राज्यात कडाडणार वीज

SRISIIM परिसरात जप्त केल्या अश्लील सीडी, लैंगिक खेळणी; Chaitanyananda चे PM Modi – Obama सह बनावट फोटो जप्त
2

SRISIIM परिसरात जप्त केल्या अश्लील सीडी, लैंगिक खेळणी; Chaitanyananda चे PM Modi – Obama सह बनावट फोटो जप्त

India’s 5th Gen Fighter Jet News: भारताचे 5th Gen Fighter Jet अंतिम टप्प्यात;  नेमकं काय आहे खास?
3

India’s 5th Gen Fighter Jet News: भारताचे 5th Gen Fighter Jet अंतिम टप्प्यात; नेमकं काय आहे खास?

Samudrayaan Mission: काय आहे भारताचे ‘मिशन समुद्रयान’; कधी सुरू होणार, काय फायदा होणार?
4

Samudrayaan Mission: काय आहे भारताचे ‘मिशन समुद्रयान’; कधी सुरू होणार, काय फायदा होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.