Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अशी सूत्रं आम्ही मूत्र मानतो’; मीडियावर टीका करताना तेजस्वी यादवांची जीभ घसरली

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतायेत. तेजस्वी यादव यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत असून या दौऱ्यांदरम्यान त्यांनी अनेकवेळा माध्यमांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 14, 2025 | 06:52 PM
'अशी सूत्रं आम्ही मूत्र मानतो'; मीडियावर टीका करताना तेजस्वी यादवांची जीभ घसरली

'अशी सूत्रं आम्ही मूत्र मानतो'; मीडियावर टीका करताना तेजस्वी यादवांची जीभ घसरली

Follow Us
Close
Follow Us:

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतायेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. या दौऱ्यांदरम्यान त्यांनी अनेकवेळा माध्यमांवर नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकारांवर संताप व्यक्त केला होता. दरम्यान आजही त्यांनी माध्यमांवर खालच्या पातळीवर टीका केली. मी अशा सूत्रांना मूत्र मानतो, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. भाजपने यावरून तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

बिहारच्या मतदार याद्यांमध्ये नेपाळ, बांगलादेशी, म्यानमारच्या नागरिकांची नावं; ISR मधून धक्कादायक माहिती समोर

प्रत्यक्षात तेजस्वी यादव पत्रकार परिषद घेत होते आणि यावेळी माध्यमांनी त्यांना काही प्रश्न विचारले. यावर ते म्हणाले की तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली? ही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे, मी अशा स्रोतांना मूत्र मानतो, अशा शब्दात त्यांनी टीका केली. असं वृत्त एका डीजिटल वृत्त वाहिनीने दिलं आहे.

तेजस्वी यांनी काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रांवर नाराजी व्यक्त केली होती. लालू प्रसाद यादव यांच्या राजवटीत लहानात लहान गुन्हाही पहिल्या पानावर छापला जात होता. आज विरोधकांना कव्हरेज मिळत नाही. मी माध्यमांना सांगू इच्छितो की स्वतःला सुधारा, अजूनही वेळ आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

भाजपने तेजस्वी यांच्या विधानावर तीव्र हल्ला चढवला आहे. भाजपचे प्रवक्ते गुरु प्रकाश पासवान म्हणाले की तेजस्वी यादव पत्रकारांना उघडपणे इशारा देत आहेत आणि धमकावत आहेत. त्यांनी सांगावे की त्यांना कोणाला घाबरवायचे आहे? हे विधान प्रेस स्वातंत्र्यावर थेट हल्ला आहे. पासवान म्हणाले, ‘लालूंच्या राजवटीत पत्रकारांवर हल्ल्यांचा इतिहास आहे. आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनाचा संदर्भ देत ते म्हणाले की त्या काळातही माध्यम स्वातंत्र्य दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि आज राजदची वृत्ती त्याच मानसिकतेची आठवण करून देते, असं त्यांनी म्हटलं आहे.

Parliament Monsoon Session 2025: संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी काँग्रेसची रणनिती: सोनिया गांधींनी बोलवली बैठक

लालू यादव यांच्या राजवटीत पत्रकारांवर झालेल्या हत्येच्या घटना

 

१९९१ मध्ये गया येथे अशोक प्रसाद यांची हत्या

 

१९९४ मध्ये सीतामढी येथे दिनेश दिनकर यांची हत्या

 

१९९७ मध्ये गोपाळगंज येथील हिंदुस्तान वृत्तपत्राच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला

 

१९९९ मध्ये सिवान येथील दूरदर्शन कार्यालयावर हल्ला

 

मधुबनी येथे ज्येष्ठ पत्रकार चंद्रिका राय यांच्यावर हल्ला झाला.

Web Title: Bjp slams tejashwi yadav after angry on media in bihar latest political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 06:52 PM

Topics:  

  • Assembly Election
  • Bihar Election
  • Tejaswi Yadav

संबंधित बातम्या

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?
1

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

बिहारच्या निकालामुळे खचून जाऊ नका, नकारात्मकता सोडा अन्…; काँग्रेसच्या बड्या नेत्याचे आवाहन
2

बिहारच्या निकालामुळे खचून जाऊ नका, नकारात्मकता सोडा अन्…; काँग्रेसच्या बड्या नेत्याचे आवाहन

बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् ज्ञानेश कुमारांचे, मतचोरीमुळे एनडीएचा विजय; हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रीया
3

बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् ज्ञानेश कुमारांचे, मतचोरीमुळे एनडीएचा विजय; हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रीया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.