
West Bengal assembly election results 2026
दरम्यान, तृणमूल खासदार काकोली घोष दस्तीदार यांना १९ मे पासून ‘वाय’ श्रेणीची केंद्रीय सुरक्षा मिळाल्याच्या बातमीने आगीत तेल ओतले. ममता बॅनर्जी यांनी त्यांना लोकसभेतील मुख्य प्रतोद पदावरून हटवून ही जबाबदारी कल्याण बॅनर्जी यांच्याकडे सोपवल्यानंतर हे घडले. राजकीय वर्तुळात याला ‘ऑपरेशन लोटस ‘पूर्वीचे सुरक्षा कवच म्हटले जात आहे.
‘आप’मध्ये ‘कमळ’ फुलले
भाजपने दिल्लीत हा फॉर्म्युला आधीच वापरून पाहिल्यामुळे तृणमूल काँग्रेसमध्येही ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा सुरू आहे. २ एप्रिल २०२६ रोजी ‘आप’ने राघव चड्डा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवून ही जबाबदारी अशोक मित्तल यांच्याकडे सोपवली होती. मात्र, १५ एप्रिल रोजी ईडीने खासदार अशोक मित्तल यांच्या घरावर छापा टाकला. दहा दिवसांनंतर मित्तल भाजपमध्ये सहभागी झाले.
२४ एप्रिल रोजी राघव चड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली की, ‘आप’च्या दहा राज्यसभा खासदारांपैकी सात खासदार चड्डा, मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रमजीत साहनी आणि स्वाती मालीवाल भाजपमध्ये विलीन होत आहेत असे जाहीर केले दोन-तृतीयांश बहुमत मिळाल्याने हे विलीनीकरण वैध ठरले आणि राज्यसभेच्या अध्यक्षांनी २७ एप्रिल रोजी त्याला मंजुरी दिली. त्यामुळे राज्यसभेत भाजपचे संख्याबळ ११३ झाले.
तृणमूलमध्ये ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चला अधिकच जोर चढ़त आहे, कारण तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जी यानी तैदया प्रमुख चंद्रबाबू नायडू यांना मोदी सरकार पाडण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या घडामोडीच्या पाश्र्वभूमीवर, तृणमूल काँग्रेसमधील वाढत्या असंतोषाचा फायदा उठवण्यासाठी भाजपचे रणनीतिकार आपले प्रयत्न तीव्र करीत असल्याचे वृत्त आहे.
चंद्राबाबू नायडू मोदी सरकारसोबतच राहतील असा भाजपच्या रणनीतिकारांना विश्वास असला तरी, ‘राजकारणात कधीही रंग कोण बदलू शकतो’ या तत्वानुसार भाजप लोकसभा आणि राज्यसभेतील आपल्या खासदारांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या, तृणमूल काँग्रेसचे लोकसभेत २९ आणि राज्यसभेत १३ खासदार आहेत.
विरोधी पक्षांचा आरोप आहे की, ‘ऑपरेशन लोटस’ इंडी आणि सीबीआयच्या दबावाखाली राबवले जात आहे. ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी या विलीनीकरणाला आव्हान दिले, पण ते अयशस्वी ठरले. भाजपचे किरेन रिजिजू यांनी सात खासदारांच्या पक्षांतराला राष्ट्र उभारणीच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हटले होते. आता बंगालमध्येही तोच प्रश्न उपस्थित होत आहे. वाय-सुरक्षा, आमदारांना हटवणे आणि त्यांची अनुपस्थिती हे ऑपरेशन लोटस भाग २ चा भाग आहे का?