
पटना : प्रवाशांच्या सोयीसाठी बऱ्याच रेल्वे स्टेशनवर एलसीडी स्क्रीन (LCD Screen) लावला जातो. या स्क्रीनवरून रेल्वेगाड्यांची माहिती प्रवाशांना मिळते. तर अनेकदा या स्क्रीनवरून जाहिरातीही पाहिला मिळतात. पण बिहारमधील पटना रेल्वे स्टेशनवर (Patna Railway Station) रविवारी धक्कादायक प्रकार समोर आला. या ठिकाणच्या रेल्वे स्टेशनवर तब्बल 3 मिनिटांपर्यंत ब्लू फिल्म सुरु होती. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली.
भारतीय रेल्वेकडून प्लॅटफॉर्मवर लावलेल्या एलसीडी स्क्रीनवर पॉर्न फिल्म सुरु होती तेही तब्बल तीन मिनिटे. स्क्रीनवर ब्लू फिल्म सुरु असल्याचा प्रकार रेल्वे स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना समजले असता त्यांच्याकडून हा व्हिडिओ तात्काळ बंद करण्यात आला. त्यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गंभीर दखल घेण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही घटना पटना रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळच्या सुमारास घडली.
प्रवाशाची पोस्ट व्हायरल
पटना स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर एक टीव्हीवर अचानक ब्लू फिल्म सुरू झाली. जवळपास 3 मिनिटं ही फिल्म तशीच सुरू होती. या सगळ्या प्रकाराने रेल्वे प्रशासनात एकच गोंधळ उडाला. प्लॅटफॉर्मवरच अशाप्रकारे ब्लू फिल्म लागल्याने प्रवाशांना मोठा धक्का बसला. यातील धक्कादायक बाब म्हणजे काही प्रवाशांनी तर त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला.
पोलिसांकडून तपास सुरु
या ब्लू फिल्म प्रकरणाची रेल्वे पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. पण अचानक घडलेल्या या प्रकारानंतर एकच गोंधळ उडाला.