boat accident in bihar
पटना : बिहारची (Bihar) राजधानी पटनाजवळ मणेर गावात एका बोटीचा अपघात (Patna Boat Accident) झाला आहे. शेरपूर घाटाजवळ गंगा नदीत ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली आहे. या अपघातातील ४५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. या बोटीतील १० प्रवासी बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे. एनडीआरएफ बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत आहे. दानापूरचे (Danapur) एसडीएमनी सांगितलं की, १० लोक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीवरील प्रवासी दानापूर, शाहपूरचे रहिवासी आहेत.
Bihar | A boat carrying 55 people sank in the Ganga river near the Shahpur PS area in Danapur
Around 50-54 persons were on the boat. 10 people were reported missing and a search operation was launched to find the missing persons: SDM Danapur (04.09) pic.twitter.com/Q9sbiCup9l
— ANI (@ANI) September 5, 2022
गंगा नदीच्या एका काठावरुन तीन बोटींमधून काही लोक घरी परतत होते. दरम्यान, नदीच्या जोरदार प्रवाहामुळे दोन बोटी एकमेकांना धडकल्या. शहापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून गर्दी बाजूला करुन शोध सुरू केला. तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं.
[read_also content=”कमळाबाईचे हेच तर मिशन होतं…सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टिका https://www.navarashtra.com/maharashtra/shivsena-criricized-bjp-over-maharashtra-politics-from-saamna-nrps-322524/”]
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत दानापूरचे राहणारे काही नागरिक रविवारी गंगा नदी पार करुन गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते. दिवसभर चारा गोळा करुन हे सर्वजण घरी परतत होते. तीन बोटींमध्ये जवळपास ५५ प्रवासी उपस्थित होते. दोन बोटी एकमेकांना धडकल्या. त्यातली एक बोट पलटली आणि त्या बोटीतील ५५ प्रवासी नदीत बुडाले. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं.