जम्मू काश्मीर निवडणुकीआधी पाकिस्तानने भारताला डिवचलं; गोळीबारात एक BSF जवान जखमी
केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. मात्र निवडणुकीची घोषणा होताच दहशत्वाद्यानी काश्मीर खोऱ्यात कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. जम्मू काश्मीरच्या उधमपूर येथे भारतीय लष्कराने मोठे यश प्राप्त केले आहे. सुरक्षा यंत्रणांनी एका चकमकीमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. विधानसभा निवडणुकीआधी सुरक्षा यंत्रणांनी मोठे यश प्राप्त केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याची विशेष पथके आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू केली आहेत. दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर देखील हे ऑपरेशन अजूनही सुरू असल्याचे समजते आहे. ठार मारण्यात आलेले दोन्ही दहशतवादी हे जैश ए मोहम्मद संघटनेचे असण्याची शक्यता आहे.
जम्मू काश्मीरमधील उधमपूर येथे सुरक्षा यंत्रणांना चार दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. तसेच दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. विधानसभा निवडणुकीत हिंसाचार घडवण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे. दहशतवाद्यांना घेतल्यानंतर त्यांनी सुरक्षा यंत्रणानावर गोळीबार सुरू केला.
तसेच आज पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात जम्मू जिल्ह्यातील अखनूर येथे आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या एक जवान जखमी झाला आहे. पाकिस्तानकडून द्विपक्षीय युद्धविराम कराराचे उल्लंघन १० वर्षानंतर जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस करण्यात आले आहे. ११ सप्टेंबर रोजी सीमेपलीकडून अखनूर जिल्ह्यात गोळीबाराची घटना घडली. या गोळीबाराला बीएसएफने जोरदार प्रत्युत्तर दिले.
जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिले मतदान हे १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये एकूण ९० विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच निवडणुकीचे निकाल ४ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत. २०१९ मध्ये जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पहिल्यांदा निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. तसेच ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा देखील हाय अलर्ट मोडवर असून, चोख बंदोबस्त ठेवला जात आहे.