Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akash Anand : मायावतींच्या पक्षात मोठी उलथापालथ! आकाश आनंद यांची सर्व पदांवरून हकालपट्टी

बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी त्यांचे पुतणे आकाश आनंद यांची तडकाफडकी पदावरून हकालपट्टी केली आहे. मायावती यांनी राज्यसभा खासदार रामजी गौतम यांच्यावरील जबाबदारी वाढवली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 02, 2025 | 04:40 PM
मायावतींच्या पक्षात मोठी उलथापालथ! आकाश आनंद यांची सर्व पदांवरून हकालपट्टी

मायावतींच्या पक्षात मोठी उलथापालथ! आकाश आनंद यांची सर्व पदांवरून हकालपट्टी

Follow Us
Close
Follow Us:

बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी त्यांचे पुतणे आकाश आनंद यांची काही दिवसांपूर्वी समन्वयकपदी नियुक्ती केली होती. आकाश आनंद यांना त्यांचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. मात्र आज त्यांची तडकाफडकी पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मायावती यांनी राज्यसभा खासदार रामजी गौतम यांच्यावरील जबाबदारी वाढवली आहे.

मायावती यांनी रामजी गौतम यांची पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावर नेमणूक केली आहे. यापूर्वी मायावती यांनी आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्याकडील पक्षाच्या जबाबदाऱ्या काढून घेतल्या होत्या. बसपा प्रमुख मायावती यांनी आज पक्षाची एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत हे निर्णय जाहीर केले. दरम्यान, आता मायावती यांचा उत्तराधिकारी कोण असेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र, मायावती यांनी यावरही पक्षाच्या बैठकीत उत्तर दिलं. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझा कोणीही उत्तराधिकारी नसेल असं त्यांनी जाहीर केलं आहे.

या बैठकीला मायावती, राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि मायावतींचे भाऊ आनंद, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा उपस्थित होते. पक्षाच्या बैठकीत राज्यसभा खासदार रामजी गौतम हे देखील उपस्थित आहेत पण आकाश आनंद या बैठकीला आले नाहीत.

गेल्या वर्षी मे महिन्यात मायावतींनी त्यांचे पुतणे आकाश आनंद यांना बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक आणि त्यांच्या उत्तराधिकारी पदावरून काढून टाकले होते. बसपा सुप्रिमोने डिसेंबर २०२३ मध्ये त्यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायावतींनी मंगळवारी आपला निर्णय मागे घेतला. त्यांनी सांगितले की, आकाश आनंद पूर्ण परिपक्वता येईपर्यंत त्याला दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवण्यात येईल.

आकाश आनंद यांनी सीतापूरमधील भाजप सरकारला ‘दहशतीचं सरकार’ म्हटलं होतं, त्यानंतर त्यांच्याविरुद्ध एफआयआर देखील दाखल करण्यात आला होता. याशिवाय, आणखी दोन ठिकाणी त्याने अपशब्धही काढले होते. रागाच्या भरात केलेल्या त्यांच्या विधानांवरही बरीच टीका होत होती.

Web Title: Bsp chief mayawati removes nephew akash anand from all posts bsp national committee meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2025 | 04:01 PM

Topics:  

  • indian politics
  • Uttar Pradesh
  • Uttar Pradesh news

संबंधित बातम्या

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून एका नेत्याने संपवले आयुष्य, आत्महत्या करण्यापूर्वी बनवले व्हिडीओ
1

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून एका नेत्याने संपवले आयुष्य, आत्महत्या करण्यापूर्वी बनवले व्हिडीओ

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…
2

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…

Independence Day 2025: UP चे 33 ग्रामप्रमुख बनले स्वातंत्र्यदिनाचे ‘हिरो’; लाल किल्ल्यावर होणार सन्मान
3

Independence Day 2025: UP चे 33 ग्रामप्रमुख बनले स्वातंत्र्यदिनाचे ‘हिरो’; लाल किल्ल्यावर होणार सन्मान

अर्धनग्न अवस्थेत शिर नसलेला मृतदेह विहिरीत सापडला, मृतदेहाचे तुकडे केले अन्…, दुर्गंधीमुळे उघड झाले रहस्य
4

अर्धनग्न अवस्थेत शिर नसलेला मृतदेह विहिरीत सापडला, मृतदेहाचे तुकडे केले अन्…, दुर्गंधीमुळे उघड झाले रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.