Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नियंत्रण सुटले अन् 18 प्रवाशांची बस थेट अलकनंदा नदीत कोसळली..; रुद्रप्रयागमध्ये अपघातांची मालिका

Bus Accident in Alaknanda river : उत्तराखंडमधील अलकानंदा नदीमध्ये प्रवासी बस कोसळली आहे. 18 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस नदीमध्ये कोसळली

  • By प्रीति माने
Updated On: Jun 26, 2025 | 12:02 PM
Bus with 18 passengers falls into Alaknanda river in Uttarakhand accident news

Bus with 18 passengers falls into Alaknanda river in Uttarakhand accident news

Follow Us
Close
Follow Us:

Bus Accident in Alaknanda river : उत्तराखंड : देशामध्ये सध्या अपघातांची मालिका सुरु झाली आहे. अहमदाबाद विमान अपघात तसेच केदारनाथ हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना झाली होती. यानंतर आता उत्तराखंडमधील अलकनंदा नदीमध्ये बस कोसळल्याने अपघात झाला आहे. रुद्रप्रयागमध्ये झालेल्या या अपघातामध्ये प्रवाशांनी भरलेली बस नदीमध्ये कोसळली. या अपघातग्रस्त बसमध्ये 18 प्रवासी प्रवास करत होते. यामधील सात प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. घटनास्थळी बचाव पथक आणि पोलीस प्रशासन दाखल झाले आहे.

अलकनंदा नदीमध्ये बस कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये 18 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी सात प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर इतर 11 प्रवासी हे बेपत्ता झाले आहेत. त्यांचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव पथक, स्थानिक पोलीस, एसडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. यापूर्वी देखील केदारनाथ आणि रुद्रप्रयागमध्ये अपघात झाला आहे. सध्या या भागातील वातावरणामध्ये बदल झाला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे उत्तराखंडमध्ये गाडी आणि हेलिकॉप्टरचे अपघात होत आहेत. नदी नाल्यांना देखील पाणी वाढले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

मीडिया रिपोर्टनुसार, 18 प्रवाशांना घेऊन ही अपघातग्रस्त बस ब्रदीनाथला चालली होती. त्यावेळी चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं. ही बस नदीत कोसळली. स्थानिकांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळवली. पोलीस आणि एसडीआरएफचं पथक या ठिकाणी आलं. UK 08, PA 7444 या बसचा अपघात झाला आहे. या बसमध्ये चालकाहह एकूण २० जण बसलेले होते. या बसमध्ये उदयपूर (राजस्थान) आणि गुजरात येथील सोनी परिवार चारधाम यात्रेसाठी आले होते. याच बसचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती देखील समोर येत आहे.  बस अपघात स्थळापासून ४० किमी अंतरावर असलेल्या गढवालमधील श्रीनगर येथील धरणाजवळ एसडीआरएफचे जवान शोध मोहीम राबवत असून नदीच्या जोरदार प्रवाहामुळे बसमधील प्रवासी पुढे वाहून आले का याची तपासणी केली जात आहे.

#WATCH | Uttarakhand | Passengers injured in a mini bus accident in Rudraprayag are receiving medical treatment at the District Hospital This morning, an 18-seater bus fell into the Alaknanda River in Gholthir of Rudraprayag district, killing one person and injuring at least… pic.twitter.com/ZKW53iUbBS — ANI (@ANI) June 26, 2025

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

विभागीय आयुक्तांनी या रुद्रप्रयागमधील अपघाताबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितली की, “प्रवाशांना घेऊन बस चालली होती. ही बस अलकनंदा नदीत कोसळली आणि अपघात झाला. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरु झालं आहे. एका व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाला आहे. विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे यांनी माहिती दिली आहे की या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सात जण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. इतर बेपत्ता प्रवाशांचा शोध पोलीस आणि एसडीआरएफकडून घेतला जातो आहे. पोलीसांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार बस अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला. १८ प्रवाशांना घेऊन जाणारी बस अलकनंदा नदीत कोसळली. या घटनेत जे प्रवासी बेपत्ता आहेत त्यांचा शोध आम्ही घेत आहोत,” अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे.

Web Title: Bus with 18 passengers falls into alaknanda river in uttarakhand accident news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 12:02 PM

Topics:  

  • Accident News
  • Kedarnath News
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर
1

पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर

Uttarakhand Bus Accident: अल्मोडा येथे भीषण रस्ता अपघात; प्रवासी बस खोल दरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू तर अनेक जखमी
2

Uttarakhand Bus Accident: अल्मोडा येथे भीषण रस्ता अपघात; प्रवासी बस खोल दरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव ‘बेस्ट’ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी
3

भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव ‘बेस्ट’ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी

गंगापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; कार-दुचाकीची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू
4

गंगापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; कार-दुचाकीची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.