
कात्रज चौकात भीषण अपघात! रस्ता ओलांडणाऱ्या दोन तरुणांना पीएमपी बसने उडवले; एकाचा मृत्यू
निहाल विलास पवार (वय २४, रा. नारायण बिल्डिंग, कात्रज) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रोहन उर्फ साहिल सुखदेव घोळवे (वय १८, रा. कात्रज) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी निहालचे वडील विलास बापू पवार (वय ५६) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीएमपी बसचालक अंकुश गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (८ नोव्हेंबर) पहाटे साडेचारच्या सुमारास निहाल आणि रोहन हे दोघे पुणे-सातारा महामार्गावरील कात्रज चौकातून भाजी मंडईच्या दिशेने जात होते. यावेळी ते रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या पीएमपी बसने दोघांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, दोघेही रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दोघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच निहालचा मृत्यू झाला. रोहनवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, अपघातानंतर बसचालक घटनास्थळी न थांबता निघून गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाडकर करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुणे महापालिकेचे नवे मुख्यालय शिवाजीनगरमध्ये उभारणार? अडीच एकर जागेचा पर्याय समोर
Ans: कात्रज चौकात भरधाव पीएमपी बसच्या धडकेत निहाल विलास पवार (वय २४) याचा मृत्यू झाला.
Ans: रोहन उर्फ साहिल सुखदेव घोळवे (वय १८) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Ans: अपघातानंतर घटनास्थळी न थांबता पसार झालेल्या पीएमपी बसचालक अंकुश गायकवाड याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.