soniya gandhi
नवी दिल्ली : केंद्र सरकारने एक मोठी कारवाई करत गांधी कुटुंबाशी संबंधित राजीव गांधी फाउंडेशन (RGF) चा फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन अॅक्ट हा (FCRA) परवाना रद्द केला आहे. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
[read_also content=”वांद्रे-वरळी सी-लिंकवर कारचा भीषण अपघात;फेरारी 812 सुपरफास्ट कारचे मोठे नुकसान https://www.navarashtra.com/maharashtra/fatal-car-accident-on-bandra-worli-c-link-ferrari-812-superfast-car-badly-damaged-nrrd-338570.html”]
2020 मध्ये गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या आंतर-मंत्रालयीन समितीचा तपास अहवाल समोर आल्यानंतर केंद्राने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी फाउंडेशनची स्थापना 1991 मध्ये झाली होती. त्याच्या वेबसाइटनुसार, फाउंडेशन शिक्षणाव्यतिरिक्त आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, महिला आणि मुले आणि अपंगत्व समर्थन यासारख्या मुद्द्यांवर काम करते. सोनिया गांधी अध्यक्ष आहेत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या RGF च्या अध्यक्षा आहेत. तर, इतर विश्वस्तांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांचा समावेश आहे.
[read_also content=”वांद्रे-वरळी सी-लिंकवर कारचा भीषण अपघात;फेरारी 812 सुपरफास्ट कारचे मोठे नुकसान https://www.navarashtra.com/photos/have-you-seen-this-glamorous-look-of-janhvi-kapoor-338575.html”]