कोलकाता: नुकतेच संदेचे अधिवेशन पार पडले. हे अधिवेशन वादळी ठरले. कारण या अधिवेशनात वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आले. हे विधेयक लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. मात्र या कायद्याला पश्चिम बंगालमधून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहेत. मुर्शिदाबाद येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलाला पाचारण करण्यात आले आहे.
मुर्शिदाबाद येथे होणाऱ्या हिंसाचारावर केंद्र आणि राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. हिंसाचाराचे लोण आणखी पसरू नये यासाठी मुर्शिदाबाद आणि अन्य काही जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १५० लोकांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सिव्ही आनंद बोस व राजभवनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
मुर्शिदाबादमध्ये केंद्र सरकारने बीएसएफच्या जवळपास ९ तुकड्या तैनात केल्या आहेत. वेळ पडल्यास या ठिकाणी सीआरपीरफ आणि आरपीएफ दल सुद्धा तैनात केले जाऊ शकते. केंद्र सरकार त्या ठिकाणी संकटात साडपलेल्या लोकांना मदत करत आहे. पश्चिम बंगालमधील मुरशीदाबाद जिल्ह्यात उमरपूर-बानिपूर परिसरात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या वेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. पोलिसांची वाहने पेटवली गेली आहेत. राष्ट्रीय महामार्ग देखील जाम केला गेला आहे. पोलिसांच्या वाहनाला आग लावल्याने येथे सध्या तानावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
आंदोलकाना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आहे. हा कायदा सरकारने मागे घ्यावा अशी मागणी या आंदोलकांची आहे. वक्फ कायद्याला देशात अनेक ठिकाणी विरोध केला जात आहे. पोलिसांनी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस पोलिसांवर आंदोलकांनी विटंाचा मारा केला. त्यानंतर रस्ता जाम केला. सध्या त्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Waqf Bill Act: वक्फ सुधारणा कायद्यामुळे पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार; सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान
शुक्रवारी मुर्शिदाबाद, उत्तर २४ परगणा आणि मालदा या जिल्ह्यांमध्ये निदर्शनांचा जोर वाढला होता. राष्ट्रीय महामार्ग-१२ वर आंदोलकांनी सरकारी बसेस आणि खासगी वाहनांना आग लावली. तसेच, सुती पोलिस स्टेशन हद्दीतील साजूर क्रॉसिंगवर पोलिसांवर दगडफेक आणि कच्च्या बॉम्बने हल्ला करण्यात आला.
मुर्शिदाबाद येथे सुरू असलेल्या हिंसाचारावर भाजप नेते शुभेन्दु अधिकारी यांनी भाष्य केले आहे. या भागातून अनेक हिंदू कुटुंबांना आपली घरे सोडून जावे लागले असे त्यांचे म्हणणे आहे. हिंदू कुटुंबांनी शेजारच्या जिल्ह्यात आश्रय घेतला आहे. जी कुटुंब घराबाहेर जाऊ शकले नाहीत, त्यांना मूलभूत गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, असे अधिकारी म्हणाले.
वक्फ सुधारणा विधेयक कायद्याच्या कचाट्यात?
वक्फ संशोधन विधेयकाल राष्ट्रपतींनी देखील मंजूरी दिली आहे. या विधेयकांचे रूपांतर आता कायद्यात झाले आहे. अनेक ठिकाणी या कायद्याचे स्वागत तर काही ठिकाणी विरोध केला जात आहे. या विधेयकाविरुद्ध जवळपास 15 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत. या बिलाविरुद्ध अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत.