Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol-Diesel Rate: देशात ‘या’ तारखेपासून महागणार पेट्रोल-डिझेल; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर एक्साइज ड्यूटीत 2 रुपये प्रती लीटर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 07, 2025 | 09:31 PM
Petrol-Diesel Rate: देशात ‘या’ तारखेपासून महागणार पेट्रोल-डिझेल; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: राज्यात रोज लाखो लोक स्वतःच्या वाहनाने एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला स्वतःचे वाहन वापरतात. मात्र आता आशा नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. देशात लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात देखील लवकरच दर लागू होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर एक्साइज ड्यूटीत 2 रुपये प्रती लीटर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार आहे. पेट्रोल-डिझेलचे दर हे 8 एप्रिलपासून वाढण्याची शक्यता आहे. सध्या कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतीत अस्थिरता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत अस्थिरता आहे. त्यातच आता केंद्र सरकारने उचलले हे पाऊल पाहता सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. रोज वाहनाने प्रवास करतात आणि जे वाहतूक प्रवाशाशी संबंधित आहेत, त्यांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता आहे.

Central Government raises excise duty by Rs 2 each on petrol and diesel: Department of Revenue notification pic.twitter.com/WjOiv1E9ch

— ANI (@ANI) April 7, 2025

एक्साइज ड्यूटी म्हणजे काय?

पेट्रोल आणि डिझेलवर आकारली जाणारी एक्साइज ड्यूटीहा केंद्र सरकारकडून लावण्यात आलेला कर आहे. या करामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढत असतात.

हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारकडे मोठी मागणी

जागतिक बाजारात क्रूड ऑईलचे दर सातत्याने कमी होत असताना त्याचा फायदा देशातील जनतेला होत नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल ६५ डॉलर प्रति बॅरल असताना देशात पेट्रोलचे दर १०९ रुपयाच्या आसपास तर डिझेलचे ९३ रुपयांच्यावर आहे. भाजपा सरकार इंधनावर अन्यायकारक झिजीया कर आकारून जनतेची लूट करत आहे. क्रूड ऑईलचे कमी झालेले दर व कररुपी लूट कमी केली तर पेट्रोल ५१ रुपये आणि डिझेल ४१ रुपये प्रति लिटर करणे शक्य आहे ते सरकारने करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आकडेवारीसह पेट्रोल, डिझेलचे दर कसे कमी करता येऊ शकतात हे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर १४५ डॉलर प्रति बॅरलवर पोहचले असतानाही पेट्रोल ७० रुपये लिटर तर डिझेल ४५ रुपये लिटर होते. मग आता तर क्रूड ऑईल ६५ डॉलर आहे तरीही पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी केल्या जात नाहीत.

पेट्रोलचा दर 51 रुपये अन् डिझेलचा…; हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारकडे मोठी मागणी

युपीए सरकार असताना पेट्रोलवर ९.५६ रुपये तर डिझेलवर ३.४८ रुपये अबकारी कर (एक्साईज टॅक्स) होता, तो भाजपा सरकारने वाढवत ३२ रुपयांपर्यंत केला, काँग्रेसची पत्रकार परिषद सुरु असताना एक्साईज टॅक्स मध्ये आणखी २ रुपयांची वाढ झाली. १ रुपया रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस होता तो आता १८ टक्के केला आहे आणि वरून टोल वसुलीही सुरुच आहे, यातील काळेबेरे काय ते समोर आले पाहिजे तसेच कृषी सेस लावून केंद्र सरकार जनतेची लूट करत आहे. एलपीजी सिलिंडरसुद्धा ४०० ते ४५० रुपये होता तो आता दुप्पट झाला आहे. आजच एलपीजी सिलींडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली आहे, ही सरकारी लूट आहे, ती तात्काळ थांबवावी, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Web Title: Central government increase excise duty on petrol and diesel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 05:27 PM

Topics:  

  • Central government
  • Diesel Petrol Price
  • Petrol Diesel Price Today

संबंधित बातम्या

GST 2.0: Jam, फ्रूट ज्युस, एसीपासून सिमेंट, ऑटोमोबाईलपर्यंत PM Modi यांच्या नव्या GST प्लानमध्ये काय होणार स्वस्त
1

GST 2.0: Jam, फ्रूट ज्युस, एसीपासून सिमेंट, ऑटोमोबाईलपर्यंत PM Modi यांच्या नव्या GST प्लानमध्ये काय होणार स्वस्त

Almatti Dam: ‘अलमट्टी धरण प्रकरणात केंद्र सरकारने…’; राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची महत्वाची मागणी
2

Almatti Dam: ‘अलमट्टी धरण प्रकरणात केंद्र सरकारने…’; राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची महत्वाची मागणी

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा २०वा हफ्ता
3

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा २०वा हफ्ता

पुन्हा महागणार पेट्रोल? ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका, कारण काय? जाणून घ्या
4

पुन्हा महागणार पेट्रोल? ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका, कारण काय? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.