Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच होणार बदल, मकर संक्रांतीनंतरचा मुहुर्त, यादी तयार…शिंदे गटाचेही दोन मंत्री?

याच वर्षी ८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यात १२ चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. तर काही दिग्गजांना मंत्रीपदावरुन डच्चू देण्यात आला होता. नव्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेनं भाजपा खासदारांमध्येही कुणाला संधी मिळणार, यावर चर्चा झडू लागलेल्या आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 30, 2022 | 02:07 PM
मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच होणार बदल, मकर संक्रांतीनंतरचा मुहुर्त, यादी तयार…शिंदे गटाचेही दोन मंत्री?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली– संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. मकर संक्रांतीनंतर कधीही मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळणार आणि कुणाला मंत्रीपदाची लॉटरी लागणार, याची यादीही तयार असल्याचं सांगण्यात येतंय. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाची तयारी सुरु झाली असून, पक्ष संघटनेला अधिक सक्षम करण्यासाठी मंत्रिमंडळातील काहीजण पक्षात सक्रिय होण्याची शक्यता आहे. तर काही जणांना नव्या मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार आहे. याच वर्षी ८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यात १२ चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. तर काही दिग्गजांना मंत्रीपदावरुन डच्चू देण्यात आला होता. नव्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेनं भाजपा खासदारांमध्येही कुणाला संधी मिळणार, यावर चर्चा झडू लागलेल्या आहेत.

[read_also content=”श्रीरामपूरमध्ये घडले सैराट! आंतरजातीय लग्नामुळं बहिणाच्या नवऱ्याची १४ वर्षानंतर कुऱ्हाडीने हत्या; रस्त्यावरच घडली रक्तरंजित कहाणी, वाचा अंगावर शहारे… https://www.navarashtra.com/crime/sister-husband-killed-after-fourteen-years-due-to-inter-caste-marriage-bloody-story-that-happened-on-the-street-read-about-it-358070.html”]

मकर संक्रांतीनंतर कधीही होऊ शकतो फेरबदल

मकर संक्रांतीनंतर कधीही मंत्रिमंडळ फेरबदल होऊ शकतो, असे संकेत सूत्रांनी दिलेले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीचा हा अखेरचा मंत्रिमंडळ फेरबदल असण्याची शक्यता आहे. पुढच्या  वर्षात काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्या राज्यांच्या नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व मिळू शकेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी हा फेरबदल होईल, असे सांगण्यात येतेय.

शिंदे गटालाही संधी

महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेनेतील १२ खासदार हे शिंदे गटासोबत गेले आहेत. त्यातील दोघांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यात राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव यांच्या नावाची चर्चा होतेय. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मविआचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळं शिवसेना एनडीएतून बाहेर पडली होती. त्यावेळी शिवसेनेकडे असलेली मंत्रिपदं ही शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे.

राज्याच्या समीकरणांचा विचार होणार

राजकीय समीकरणं आणि जातीय समीकरणांचा विचार करुन हा मंत्रिमंडळ फेरबदल होणार असल्याचं सांगण्यात येतंय. पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांपूर्वीच त्या त्या राज्यांच्या खासदारांना मंत्रिमंडळात प्राधान्य दिल्यामुळे भाजपा विरोधकांवर मात करु शकेल असा विश्वासही वर्तवण्यात येतोय.

मंत्र्यांच्या कामगिरीचाही होणार विचार

ज्या मंत्र्यांना डच्चू देण्यात येईल, त्यात सुमार कामगिरी केलेल्या मंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. फेरबदलापूर्वी मंत्र्यांचे प्रगतीपुस्तकही तपासले जाणार आहे. ज्याची कामगिरी उत्कृष्ट आहे. त्यांना वगळण्यात येणार नाही. लोकसभेतील खासदारांना अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. या खासदारांना काही महत्त्वाची खाती दिली जातील. गुजरात निवडणुकीत दैदिप्यमान यश मिळवणाऱ्या भाजपाच्या राज्यातील खासदारांनाही मंत्रिपद देऊन, गौरवण्यात येण्याची शक्यता आहे. महिला आणि वंचित समाजातील खासदारांचाही यात समावेश असण्याची शक्यता आहे.

यादी तयार, फक्त तारीख जाहीर होणे बाकी

भाजपा पक्षश्रेष्ठींनी मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार केली असल्याची माहिती आहे. आता केवळ तारखेकडे लक्ष असल्याचं सांगण्यात येतय. भाजपा पक्ष आणि भाजपाशासित राज्यांमध्ये चांगला समन्वय असावा यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत.

Web Title: Change in modi union cabinet soon after makar sankranti list ready two ministers from shinde group two

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2022 | 02:06 PM

Topics:  

  • Makar Sankranti

संबंधित बातम्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांत सण का साजरा केली जाते? जाणून घ्या यामागील भौगोलिक आख्यायिका
1

Makar Sankranti 2025: मकर संक्रांत सण का साजरा केली जाते? जाणून घ्या यामागील भौगोलिक आख्यायिका

Makar Sankrant 2026 : तिळाचे लाडूच नाही तर सणाला हा पारंपारिक पदार्थही मानला जातो खास, जाणून घ्या रेसिपी
2

Makar Sankrant 2026 : तिळाचे लाडूच नाही तर सणाला हा पारंपारिक पदार्थही मानला जातो खास, जाणून घ्या रेसिपी

हलव्याच्या दागिन्यांनी वाढवा मकरसंक्रांती सणाचा गोडवा! हळदीकुंकू समारंभात सौंदर्य दिसेल खुलून
3

हलव्याच्या दागिन्यांनी वाढवा मकरसंक्रांती सणाचा गोडवा! हळदीकुंकू समारंभात सौंदर्य दिसेल खुलून

Makar Sankranti 2026: 23 वर्षांनी मकर संक्रांतीला होणार सूर्य शनिचा महासंयोग, धार्मिकदृष्ट्या काय आहे महत्त्व
4

Makar Sankranti 2026: 23 वर्षांनी मकर संक्रांतीला होणार सूर्य शनिचा महासंयोग, धार्मिकदृष्ट्या काय आहे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.