Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Makar Sankranti 2026: 23 वर्षांनी मकर संक्रांतीला होणार सूर्य शनिचा महासंयोग, धार्मिकदृष्ट्या काय आहे महत्त्व

हिंदू धर्मातील सणांपैकी महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य आणि शनीचा दुर्मिळ महासंयोग होणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 04, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • मकर संक्रांत कधी आहे
  • सूर्य शनि महासंयोग
  • मकर संक्रांतीचे धार्मिकदृष्ट्या महत्त्व
 

नववर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा सण यावेळी विशेष असणार आहे. मकर संक्रांतीचा सण धार्मिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते.

मकर संक्रांतीचा सण नवीन ऊर्जा, उज्ज्वल भविष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी सूर्य देवाची पूजा करणे आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. तीळ, काळे तीळ, उडीद डाळ, लोखंड, उबदार वस्त्र, तांबे आणि गूळ यांचे दान केल्यास पुण्यप्राप्ती होते. तसेच सूर्याला अर्घ्य देणे आणि शनिवारी तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. मकर संक्रात यंदा १४ की १५ जानेवारीला आहे? ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा मकर संक्रातीला २३ वर्षांनंतर सूर्य-शनि महासंयोग बनतोय. वैदिक दिनदर्शिकनुसार, यंदा मकर संक्राती सण १४ जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे.

Bhogi 2026: यंदा भोगीचा सण कधी आहे? जाणून घ्या या सणाचे धार्मिक महत्त्व आणि परंपरा

पूजा विधी करताना नियमांचे पालन करावे

ज्योतिषींच्या मते, यंदा सूर्य आणि शनिचा दुर्मिळ महासंयोग होत आहे. ज्योतिषांच्या मते, २३ वर्षांनंतर येणारा हा एक विशेष संयोग आहे, जो काही राशींनाच सौभाग्य आणि यश देईल. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांची राशी या तिन्ही राशींमध्ये येत नाही त्यांनी या दिवशी विशेष काळजी घ्यावी.

धार्मिक विधी आणि उपासनेचे परिणाम जास्त

ज्योतिषांच्या मते, १४ जानेवारी रोजी तयार होणारा हा संयोग दर २३ वर्षांनी एकदाच होतो. या दिवशी केलेल्या धार्मिक विधी आणि उपासनेचे परिणाम इतर दिवसांपेक्षा अनेक पटीने जास्त मानले जातात. हा महासंयोग ज्याच्या राशी सध्या अनुकूल ग्रह स्थितीत आहेत त्यांच्यावर विशेषतः परिणाम करेल. या दिवशी श्रद्धेने केलेली उपासना जीवनात स्थैर्य, शांती आणि सकारात्मक बदल घडवून आणू शकते.

Shattila Ekadashi 2026: षटतिला एकादशी का साजरी केली जाते? या दिवशी करा ‘हे’ उपाय, दूर होतील अडचणी

नियमांचे पालन करा

या दिवशी पूजा आणि विधी करताना नियमांचे पालन करावे आणि काळजी घ्यावी, या महासंधीचा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक प्रभाव पडणार नाही तर सामाजिक आणि मानसिक पातळीवर सकारात्मक ऊर्जादेखील मिळेल. कुटुंब आणि समाजात सुसंवाद वाढविण्यासाठी, नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि एखाद्याच्या कार्यक्षेत्रात यश मिळविण्यासाठी हा काळ शुभ मानला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मकर संक्रांती म्हणजे काय?

    Ans: मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात होते आणि तो अत्यंत शुभ मानला जातो.

  • Que: सूर्य–शनी महासंयोग म्हणजे काय?

    Ans: जेव्हा सूर्य आणि शनी एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा त्याला सूर्य–शनी महासंयोग म्हणतात. हा योग कर्म, न्याय आणि आत्मशुद्धीशी संबंधित मानला जातो.

  • Que: या दिवशी कोणते धार्मिक उपाय करणे शुभ मानले जाते?

    Ans: सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य देणे, शनिदेवांसाठी तेलाचा दिवा लावणे, तीळ व उडीद डाळ दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.

Web Title: Makar sankranti 2026 sun saturn rare yog after 23 years what is the religious significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Makar Sankranti

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.