Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यात चीनचा सहभाग…? तपासात धक्कादायक माहिती उघड

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएचे पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्या देखरेखीखाली स्थापन केलेल्या पथकाकडून सुरू आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 28, 2025 | 12:27 PM
'आम्ही पाकिस्तानसोबत'; चीनने स्पष्ट केली भूमिका

'आम्ही पाकिस्तानसोबत'; चीनने स्पष्ट केली भूमिका

Follow Us
Close
Follow Us:

Pahalgam Terror Attack:  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील गुप्तचर यंत्रणांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून या घटनेचा तपास केला जात आहे. या प्रकरणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेच्या तपासांतर्गत तपास यंत्रणांना चीनच्या एका संशयास्पद सॅटेलाईट फोनचा मागोवा लागला आहे. तपास यंत्रणांना चीनच्या एका ‘हुआवेई सॅटेलाइट फोन’चा तपास लागला आहे. पहलगाम हल्ल्यावेळी हा फोन घटनास्थळावर होता, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हुआवेई ही चीन कंपनी आहे. या कंपनीच्या उपग्रह उत्पादनावर भारतात बंदीही घालण्यात आली आहे. घटनेवेळी हा फोन पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही परदेशी स्त्रोताच्या माध्यमातून भारतात आल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे. २२ एप्रिलला ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी या फोनवरून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांशी चार वेळा संपर्क साधण्यात आला होता. पण घटनास्थळी मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित असल्याने हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर केला गेला नाही. हल्ल्यापूर्वी आणि त्यादरम्यान किमान १० लोक एन्क्रिप्टेड अॅप्सद्वारे त्यांच्या हँडलरशी गप्पा मारत होते आणि त्यांना कॉल करत होते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न; पाक सैन्याने 54 दहशतवाद्यांना ठार केले

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएकडे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएने हाती घेतला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएचे पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्या देखरेखीखाली स्थापन केलेल्या पथकाकडून सुरू आहे. अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी घटनास्थळावर दाखल होणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या मार्गांवर कसून तपास केला जात आहे. काश्मीरमधील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एकाला कारणीभूत ठरलेल्या घटनांचा क्रम निश्चित करण्यासाठी प्रत्यक्षदर्शींची सखोल चौकशी केली जात आहे. यासोबतच फॉरेन्सिक आणि इतर तज्ञांच्या मदतीने, संपूर्ण परिसराची सखोल तपासणी करत आहेत आणि पुरावे गोळा करत आहेत.

विशेषज्ञांच्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना आता अशा संप्रेषण साधनांचा वापर करत आहेत, जे सैनिकी दर्जाच्या एन्क्रिप्शनने सुसज्ज आहेत. यात एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, क्वांटम-प्रतिरोधक अल्गोरिदम आणि स्टेग्नोग्राफीसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हे उपकरणे अतिशय वेगाने रेडिओ फ्रीक्वेन्सी बदलतात, ज्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण होते. तसेच, सॅटेलाइट फोन स्थानिक नेटवर्कला वगळून थेट जागतिक संप्रेषण यंत्रणेशी जोडलेले असतात, त्यामुळे त्यांचा माग काढणे अधिक कठीण बनते.

पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून सापळा रचून पकडले

भारत-पाकिस्तान तणावावर चीनची चिंता

दरम्यान, चीनने पुन्हा एकदा पाकिस्तानला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानी उपपंतप्रधान इशाक डार यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करताना पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान तणावाबद्दल चिंता व्यक्त केली आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली. पाकिस्ताननेही निवेदन जारी करून चीनच्या समर्थनाबद्दल आभार मानले आणि दोन्ही देशांमधील “सर्व ऋतूतील धोरणात्मक भागीदारी” (ऑल वेदर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप) पुन्हा एकदा अधोरेखित केली.

 

Web Title: Chinas involvement in pahalgam attack shocking information revealed in investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • india
  • Jammu Kashmir Terror Attack
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan

संबंधित बातम्या

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा
1

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार
2

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार

Kissing To CM: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन; पाकिस्तानमध्ये बवाल! Viral Video पाहून तुम्हीही व्हाल गपगार
3

Kissing To CM: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन; पाकिस्तानमध्ये बवाल! Viral Video पाहून तुम्हीही व्हाल गपगार

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’
4

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.