
बिहारमध्ये एनडीएचा दणदणीत विजय
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये महाआघाडीला केवळ 36 जागा
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत एनडीएने प्रचंड मोठे बहुमत प्राप्त केले आहे. तर महाआघाडीचा सुपडासाफ झाला आहे. भाजप बिहारमधील क्रमांक एक नंबरचा पक्ष बनला आहे. दरम्यान बिहारमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व विजयाबाबत देशभर जल्लोष साजरा केला जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीट करत अभिनंदन केले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
पुन्हा एकदा एनडीए सरकार!
जन-जन का समर्थन अपार,
फिर से एनडीए सरकार! बिहार में यह जीत मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके ऊपर विश्वास, हमारे नेता मा. अमितभाई शाह इनकी चाणक्यनीति, भाजपा अध्यक्ष मा. जे. पी. नड्डाजी का मार्गदर्शन, भाजपा के महासचिव और बिहार प्रभारी विनोद तावडे जी और चुनाव प्रभारी केंद्रीय… pic.twitter.com/6dWUaansrD — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 14, 2025
बिहारमधील हा विजय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रद्धेचे, आपले नेते माननीय अमितभाई शाह यांच्या चाणक्य धोरणाचे, भाजप अध्यक्ष माननीय जे.पी. नड्डा यांचे मार्गदर्शनाचे, भाजपचे सरचिटणीस आणि बिहार प्रभारी विनोद तावडे यांचे कठोर परिश्रम आणि निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे कठोर परिश्रम आणि एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कठोर परिश्रमाचे परिणाम आहे. मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. बिहार, या प्रेमासाठी, विश्वासासाठी आणि प्रचंड पाठिंब्यासाठी धन्यवाद!
देवेंद्र फडणवीसांचा जलवा
बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळाले आहे. एनडीएने बिहारचा गड राखला आहे. दरम्यान भाजपने बिहारसाठी स्टार प्रचारक घोषित केले होते. या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील नाव होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमधील अनेक मतदारसंघात प्रचार केला होता.
देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार केलेल्या मतदारसंघात एनडीएला फायदा होताना दिसून येत आहे. एनडीएचे अनेक उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे जवळपास त्यांचा विजय निश्चित समजला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 61 मतदारसंघात जाऊन प्रचार केला होता. त्यापइकी जवळपास 40 ते 50 मतदारसंघात एनडीएच्या उमेदवारांना फायदा होताना दिसून येत आहे, सारन, सीवान, पाटणा, सहरसा , समस्तीपुर, खगडिया आणि अन्य मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या मतदारसंघात प्रचार केला होता, त्या मतदारसंघात एनडीएचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बिहारच्या निकालावरुन महाविकास आघाडीमध्ये जुंपली
संपूर्ण देशाचे लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. जोरदार प्रचार आणि टीका यानंतर दोन टप्प्यामध्ये मतदान पार पडले. यानंतर आता बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (दि.14) लागणार आहे. त्यासाठी सकाळपासून मतमोजणी सुरु असून यामध्ये सध्या तरी भाजपची असलेली NDA आघाडी ही प्रचंड मतांनी आघाडीवर आहे. यावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.