वर्षा अखेरीस बिहारमध्ये निवडणुका होणार
नितीश कुमारांची युवकांसाठी मोठी घोषणा
सत्ताधारी आणि विरोधकांनी सुरू केली निवडणुकीची तयारी
Bihar Assembly Election 2025: लवकरच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. सध्या निवडणुकीची रणधुमाळी हळू हळू सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मतदारांना खुश करण्यासाठी सरकारची तिजोरी उघडली आहे. नितीश कुमार यांनी तरुणांसाठी एक नवीन घोषणा केली आहे. त्यामुळे बिहारमधील युवकांना फायदा मिळणार आहे.
विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यातील युवकांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत सांगितले की, ‘मुख्यमंत्री निश्चय स्वयं सहाय्यता भत्ता योजने’अंतर्गत पदवीधर असलेल्या बेरोजगार युवकांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी दर महिन्याला 1,000 रूपये दिले जाणार आहेत.
नवम्बर 2005 में नई सरकार बनने के बाद से ही अधिक से अधिक युवाओं को सरकारी नौकरी और रोजगार देना तथा उन्हें सशक्त और सक्षम बनाना हमलोगों की प्राथमिकता रही है। आप अवगत हैं कि अगले पांच साल में एक करोड़ युवाओं को सरकारी नौकरी और रोजगार देने का लक्ष्य निर्धारित किया गया है। आने वाले…
— Nitish Kumar (@NitishKumar) September 18, 2025
या आधी बिहारमध्ये केवळ इंटरमिजिएट पदवी असलेल्या बेरोजगार युवकांना लाभ मिळत होता. ‘मुख्यमंत्री निश्चय स्वयं सहाय्यता भत्ता योजनेचा विस्तार करण्यात आल्याने आपल्याला आनंद होत असल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले. या योजनेचा लाभ कला, विद्यान, वाणिज्य विषयात पदवीधर बेरोजगार युवकांना मिळणार आहे.
व्याजाशिवाय शैक्षणिक कर्ज मिळणार
बिहारमधील सर्व २४३ जागांसाठी पुढील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणुका भारतीय निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातील. गेल्या विधानसभा निवडणुका २०२० च्या त्याच महिन्यांत झाल्या होत्या. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सत्तेत आली आणि नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. याचदरम्यान आता नितीश कुमार यांनी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
बिहार विधानसभा निवडणूक २०२५ (Bihar Election 2025) पूर्वीच नितीश कुमार यांच्या सरकारने विद्यार्थ्यांना व्याजाशिवाय शैक्षणिक कर्ज देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सध्या १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्ज दिले जाते. यावर ४ टक्के व्याजदर लागू होता, जो आता पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री नितीश यांनी मंगळवारी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “सात निश्चय योजनेअंतर्गत, उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या बिहारमधील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी २ ऑक्टोबर २०१६ पासून विद्यार्थी क्रेडिट कार्ड योजना लागू करण्यात आली आहे. बिहार विद्यार्थी क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत, सामान्य अर्जदाराला ४ टक्के व्याजदराने आणि महिला, अपंग आणि ट्रान्सजेंडर अर्जदारांना १ टक्के व्याजदराने जास्तीत जास्त ४ लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज दिले जाते. आता या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्जाची रक्कम सर्व अर्जदारांसाठी व्याजमुक्त असेल.”