
CM Yogi Adityanath makes Vande Mataram mandatory in schools in Uttar Pradesh
Yogi Adityanath: उत्तर प्रदेश: राष्ट्रीय गान असलेल्या वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण झाली आहे. वंदे मातरम् हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी १८७० मध्ये लिहिलेले एक गीत आहे. हे गीत स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणास्रोत ठरले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम गायले. यानंतर आता वंदे मातरम गीताची 150 वर्षपूर्ती साजरी केली जात आहे. यानिमित्ताने उत्तर प्रदेशमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी UP मधील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गाणे अनिवार्य करण्यात आल्याची घोषणा केली आहे.
उत्तर प्रदेशमधील कार्यक्रमामध्ये योगी आदित्यनाथ यांनी वंदे मातरम हे अनिवार्य करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. योगी आदित्यनाथ यांनी यापुढे उत्तर प्रदेशमधील प्रत्येक शाळांमध्ये वंदे मातरम हे अनिवार्य असणार आहे. आता, राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये दररोज ‘वंदे मातरम्’ या गाण्याने सुरुवात होईल. योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना ही प्रणाली तात्काळ लागू करण्याचे आणि सर्व शाळांमध्ये शिस्त, स्वच्छता आणि देशभक्तीचे वातावरण सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वंदे मातरम 150 वर्षपूर्ती कार्यक्रमामध्ये योगी आदित्यनाथ यांनी कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला. योगी आदित्यनाथ म्हणाले की, “भारताच्या स्वातंत्र्याकडे नेणाऱ्या मंत्रालाच काँग्रेसने जातीयवादी म्हणत त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे दुर्दैवाने १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. जर आपला विश्वास आपल्या राष्ट्रीय एकता आणि अखंडतेला अडथळे निर्माण करत असेल, तर आपण आपला विश्वास बाजूला ठेवला पाहिजे… काही लोकांसाठी, आजही, त्यांचा विश्वास आणि धर्म भारताच्या एकता आणि अखंडतेपेक्षा अधिक महत्त्वाचा बनतो… जर भारतात नवीन प्रकाश उदयास येण्याचे धाडस करत असेल, तर आपण त्याला भारताच्या अखंडतेला आव्हान देण्यापूर्वीच पुरले पाहिजे,” असा आक्रमक पवित्रा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “व्यक्ती, जाती, पंथ आणि धर्म राष्ट्रापेक्षा मोठे असू शकत नाहीत. भारताच्या अखंडतेचे शिल्पकार, लोहपुरुष, “भारतरत्न” सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती सोहळ्याचा भाग म्हणून आज गोरखपूरमध्ये आयोजित “एकता यात्रेत” सहभागी झालो आणि एकत्रितपणे “वंदे मातरम” हे राष्ट्रीय गीत गायले. ही “एकता यात्रा” राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये आयोजित केली जाणार आहे. आम्हाला विश्वास आहे की ही यात्रा व्यापक जनजागृती करेल, स्वदेशी (स्वावलंबन) वाढवेल आणि प्रत्येक नागरिकामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करेल,” असे देखील योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.